Archive Pages Design$type=blogging

भंडारदरा दोन दिवसात होणार ओव्हरफ्लो ; मुळातही विक्रमी आवक धरणांच्या पाणलोटाची अतीवृष्टीने दाणादाण

भंडारदरा दोन दिवसात होणार ओव्हरफ्लो ; मुळातही विक्रमी आवक धरणांच्या पाणलोटाची अतीवृष्टीने दाणादा ण कॉलनी, दत्तनगर, मोरेश्‍वर कॉल...


भंडारदरा दोन दिवसात होणार ओव्हरफ्लो ; मुळातही विक्रमी आवक
धरणांच्या पाणलोटाची अतीवृष्टीने दाणादा
कॉलनी, दत्तनगर, मोरेश्‍वर कॉलनी, नाईकवाडीनगरचा भाग संपूर्णपणे पाण्याखाली होता. धुमाळवाडी-नवलेवाडी गावची उपनगरे इथेही मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. अकोले तालुक्यातील कोतूळ परिसरात काल दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली संततधार पावसाने परिसराला झोडपून काढले यामुळे मुळा नदीला काल पूर आला. कोतूळ गावाला पाणी पुरवठा करणारे बोरी पाझर तलाव दुपारी ३ वाजता भरून वाहू लागला बोरी धरणा कडे पाण्याची मोठी आवक सूरु आहे.
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्रात आठवडा भराचे विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरु असल्याने मुळा धरणात काल सकाळ पासून मोठ्या प्रमाणावर आवक होऊ लागली आहे. काल सकाळी धरणातील पाण्याची आवक ३३६७१ क्यूसेसने होती ती दुपारी १२ वाजता ४0८00 क्यूसेसवर पोहचली असून त्यात वाढच होत असल्याने सायंकाळी ही आवक ह्यापेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे.धरणातील पाणी साठा १५0९५वरून दुपारी १५३७८ द श ल फुटावर पोहचला असून सायंकाळी १६000 वर पोहोचली. दमदार पावसामुळे मुळाच्या लाभक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मुळा नदी तुडुंब भरुन वाहू लागली असून घारगाव पोलिस स्टेशनच्या भिंतीलगत पाणी आले असून अपघातातील वाहने पुराच्या पाण्यात बुडाली आहेत. तसेच मुळा नदीचे पाणी घारगावमधील ओढयात आल्याने घारगाव, बोरबन, कोठे बु।।, वनकुटे आदी गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर घारगावचा आठवडे बाजार असतो. पण पावसामुळे नागरिकांचे हाल झाले. मुळा नदी तुडुंब भरुन आल्याने आज दुसर्‍यांदा मांडवेचा पुल पुर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
सिन्नर तालुक्यात असणारे भोजापुर धरण काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भरल्याने ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदी पात्रात ३000 क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने तब्बल चार ते पाच वर्षानंतर म्हाळुंगी नदीला पूर आला आहे. यामुळे प्रशासनाने नदी काठच्या सर्व गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.अकोले-श्रीरामपूर/प्रतिनिधी 
अकोले तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने थैमान घातले असून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रासह मुळा धरण पाणलोट क्षेत्रातही अतवृष्टी झाली. रतनवाडीला सुमारे २0 इंच पावसाची नोंद झाली आहे. तर मुळा नदीला पूर आला आहे. आढळा नदीही दुथडी भरून वहात आहे. तर भंडारदरा धरणात ९३६८ दलघफु एवढा पाणी साठा झाला आहे. 
अकोले तालुक्यात गेले दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील मुरशेत, उडदावणे, पांजरे, घाटघर, साम्रद, रतनवाडी, कोलटेंभे, मुतखेल, शेंडी, भंडारदरा, या परिसरात अतवृष्टी झाली असून आदिवासी जनजीवन गारठले आहे. अकोले शहरापासून ते विठे घाट, राजूर, केळुंगण, तेरुंगण, रंधा, वाकी, कोदणी इथेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून कोल्हार घोटी राज्यमार्गावर केळुंगण जवळ रस्त्यात बाभळीचे झाड पडल्याने दीड ते दोन तास वहातूक ठप्प झाली होती.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: भंडारदरा दोन दिवसात होणार ओव्हरफ्लो ; मुळातही विक्रमी आवक धरणांच्या पाणलोटाची अतीवृष्टीने दाणादाण
भंडारदरा दोन दिवसात होणार ओव्हरफ्लो ; मुळातही विक्रमी आवक धरणांच्या पाणलोटाची अतीवृष्टीने दाणादाण
http://epunyanagari.com/epaperimages/03082016/03082016-md-ah-3-1339-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_27.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_27.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago