शहराबरोबरच प्रभागाच्या विकासाला प्राधान्य : सौ. कदम अहमदनगर; मला महापौरपदाचा मान हा याच प्रभागातून निवडून आल्यामुळेच मिळाला आहे. य...
शहराबरोबरच प्रभागाच्या विकासाला प्राधान्य : सौ. कदम

अहमदनगर;
मला महापौरपदाचा मान हा याच प्रभागातून निवडून आल्यामुळेच मिळाला आहे. या प्रभागातील नागरीकांच्या सहकार्यानेच प्रथमत: नगरसेविका आणि आता महापौर म्हणून मनपाचा कारभार सांभाळतानाच प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देणार आहे. यापूर्वीही अनेक कामे झाली असली तरी मोठ-मोठे काम करताना अडचणी येत होत्या. परंतु तुमच्या आशिर्वादाने मी महापौर असल्याने प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन महापौर सौ. सुरेखा कदम यांनी केले. प्रभाग क्र. २३ झारेकरगल्ली येथे बंदिस्त पाईपगटार कामाचा शुभारंभ सौ. कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुभाष लोंढे, बाळासाहेब बोराटे, शहरप्रमुख संभाजी कदम, शहर बॅंक संचालक शिवाजी कदम, मनोज जेटला, ओम काळे, योगेश सिद्दम, बाळासाहेब खताळ, निल गांधी, सोनू गिते, जंगम, सादूल आदी उपस्थित होते. यावेळी नगरसेवक लोंढे म्हणाले, महापौर हे आपल्या प्रभागातील असल्याने आता मोठय़ा प्रमाणात निधीची उपलब्ध होवून प्रभागातील समस्या सोडविल्यास मदत होईल. यावेळी बोराटे म्हणाले, प्रभागाच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्रित प्रय▪करत असून, आता महापौरही याच प्रभागातील असल्याने जास्तीत जास्त कामे करुन प्रभाग समस्या मुक्त करण्याचा आमचा प्रय▪राहिल. यावेळी महापौर सुरेखा कदम
.









