मुळा धरणाचे पाणी पाथर्डीसाठी सोडण्याची मागणी पाथर्डी; मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यात सोडुन तलाव व बंधारे पाण्याने भरावेत. द...
मुळा धरणाचे पाणी पाथर्डीसाठी सोडण्याची मागणी
पाथर्डी;
![]()
मुळा धरणाचे पाणी पाथर्डी तालुक्यात सोडुन तलाव व बंधारे पाण्याने भरावेत. दुष्काळी भागात कोट्यावधी रुपये टँकरवर खर्च करावे लागतात. तलाव भरले तर पिण्याच्या पाण्यासोबत शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सुटण्यास मदत होईल. तलावात पाणी सोडण्याची मागणी तिसगाव व परीसरातील कार्यकर्त्यांनी तहसिलदारांकडे केली आहे.
तिसगावचे ग्रामपंचायतीचे नेते भाऊसाहेब लवांडे यांच्या नेतृत्वाखाली गोटीराम रांधवणो, रफिक शेख, भिवसेन अकोलकर, सचिन साळवे, आरीफ तांबोळी, शरद खंडागळे, बाबासाहेब रांधवणो, नंदु वाबळे यांनी तहसिल कार्यालयात येवुन नायब तहसिलदार जयसिंग भैसडे यांना लेखी निवेदन दिले. यामधे म्हटले आहे की, मुळा धरणातील पाणी सध्या चार्यांमधुन सोडण्यात आलेले आहे. पाथर्डी तालुक्यात पश्चिम भागात अद्यापही विहीरीचे पाणी वाढलेले नाही. पाऊस झाला मात्र त्याचा फायदा केवळ पिकासाठी आहे. अजुनही अनेक गावात पिण्याचे पाणी विहरीवर मिळते. परंतु शेतीला पाणी उपलब्ध नाही. मुळा चारीतुन पाणी सोडुन चिचोंडी, तिसगाव मढी,शिरापुर,घाटशिरस,सातवड,कौडगाव,त्रिभुवनवाडी,मोहोज,मांडवे, लोहसर, खांडगाव, दगडवाडी, भोसे, शिराळ, वैजुबाभुळगाव या भागातील बंधारे व तलाव पाण्याने भरुन घेतले तर पाणी टंचाई दुर होईलच व शेतीला पाणीही काही प्रमाणात मिळेल. मुळा पाटबंदारे विभागाच्या अधिकार्यांनाही निवेदन देवुन तशी मागणी केली आहे. यामुळे शासनाचा पिण्याच्या पाण्याचा टँकरवर होणारा कोट्यावधी रुपयाचा खर्चही कमी होण्यास मदत होईल. पाणी सोडण्याचा विषय पाटबंधारे विभागाचा आहे. तरीही शेतकर्यांचा प्रश्न म्हणुन आम्ही जिल्हाधिकार्यांना याबाबत अहवाल पाठवू असे नायब तहसिलदार जयसिंग भैसडे यांनी सांगितले
|










