Archive Pages Design$type=blogging

शेवगाव तालुक्यात तिरंगा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत

शेवगाव तालुक्यात तिरंगा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत हातगाव ; केंद्र शासनाने जनतेच्या हितासाठी ७0 तर राज्याने २४ प्रभावी कल्याणकारी...


शेवगाव तालुक्यात तिरंगा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
हातगाव ;
केंद्र शासनाने जनतेच्या हितासाठी ७0 तर राज्याने २४ प्रभावी कल्याणकारी योजना सुरू केल्या असून, त्या ज़नतेपर्यंत पोहचण्यासाठी तिरंगा यात्रेचे आयोज़न करण्यात आले आहे. प्रलंबित नद्याजोड हा महत्वाकांशी प्रकल्प टप्प्याटप्याने राबविण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील असल्याची माहिती खा. दिलीप गांधी यांनी या वेळी दिली. भारतीय ७0 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र व राज्य शासनाने जनतेच्या कल्याणासाठी राबविलेल्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भाजपने सरकार आपल्यादारी योजनेंतर्गत जिल्ह्यात दि. १५ ते २३ ऑगस्ट दरम्यान तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेचे गावागावांत स्वागत करण्यात आले, या वेळी खा. गांधी बोलत होते. खा. गांधी हे शेवगाव तालुक्याच्या दौर्‍यावर आले होते. तिरंगा यात्रा आव्हाणे, वडुले बुद्रुक, वाघोली, निंबेनांदूर,ढेरजळगाव, भातकुडगाव, फाटा, देवटाकळी, शहरटाकळी, दहिगावने, मठाचीवाडी, रांजणी, दोरसडे, भायगाव, जोहरापूर, खुंटेफळ, ताजनापूर, एरंडगाव, घोटण, कर्हेटाकळी, खानापूर, तळणी, शेवगाव,राक्षी, चापडगाव, गदेवाडी, दहिगाव शे, खडका-मडका, मुंगी, हातगाव, कांबी बोधेगाव, बलामटाकळी, लाडजळगाव, गोळेगाव, शिंगोरी आदी गावांत पोहचली.या काळात केंद्र व राज्य शासनाने राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचण्यासाठी खा. दिलीप गांधी यांच्या संकल्पनेतून शासकीय विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे नागरिकांना वितरण करण्यात आले. अनेक गावांत स्वच्छतेसाठी सामूहिक शपथ देण्यात आली.

या वेळी खा. गांधी म्हणाले, देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी मोठे बलिदान दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी व सामान्यांच्या परिवर्तनासाठी स्वच्छ भारत, जनधन योजना, बारा रुपयात जीवन विमा, अटल पेन्शन, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, ग्रामीण आवास योजना, शेतकर्‍यांना विमा, पीकविमा आदी योजनांसह रस्ते, वीज, प्रश्न सामान्य जनतेच्या विकासासाठी हाती घेतले आहेत. मुद्रा योजनेंतर्गत नगर जिल्ह्यात १३३४0 लाभार्थ्यांना २४0 कोटींचे कर्ज वाटप केल्याचे खा. गांधी यांनी सांगितले. शेकडो मोटारसायकली या रॅलीत सहभागी झाल्या.नगरसेवक सुवेंद्र गांधी, किशोर बोरा, श्रीकांत साठे, बाळासाहेब पेटघण, दादा बोठे, वल्लभ पुष्कर, तालुकाध्यक्ष बापू पाटेकर, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार वैद्य, नगरसेवक कमलेश गांधी, अशोक आहुजा, बंडू रासणे, गणेश कराड, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नितीन फुंदे, वाय.डी. कोल्हे, संतोष पुरोहित, मुसाभाई शेख, दिलीपराव लांडे, ताराचंद लोंढे, बाळासाहेब कोळगे, सालारभाई शेख, बाळासाहेब झिरपे, रवी सुरवसे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष भरत लोहकरे, सरपंच संजीवनी गायकवाड, मयूर हुंडेकरी, माजी जि.प. सदस्य प्रकाश भोसले, कैलास अंधारे, बाळासाहेब फुंदे, केशव आंधळे, संजय खेडकर, राजेंद्र बनसोडे, संजय वडते, पांडुरंग मिसाळ, काशिनाथ चौधरी, मारुती नागरे, रजनिकांत कटारिया, विश्‍वनाथ घोरतळे, सुनील चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: शेवगाव तालुक्यात तिरंगा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
शेवगाव तालुक्यात तिरंगा यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत
http://epunyanagari.com/epaperimages/22082016/22082016-md-ah-8-1460-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_300.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_300.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago