श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी : देशमुख महाराज; अहमदनगर ; आपण आपला उध्दार करावा. मिथ्या देहाभिमानाच्या नादी लागून घात करून घे...
श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी : देशमुख महाराज;
अहमदनगर ;

आपण आपला उध्दार करावा. मिथ्या देहाभिमानाच्या नादी लागून घात करून घेवू नये. आपण स्वत:च स्वत:चे मित्र आहोत व स्वत:च स्वत:चे शत्रू आहोत. ज्याने स्वत:च स्वत:ला जिंकले तो स्वत:च स्वता:चा मित होय, पण ज्यांचा स्वत:ावर ताबा नाही तो कोश कीटकाप्रमाणे स्वत:चा वैरी आहे, असे समजावे. ज्ञानाला विज्ञानाची जोड असावी, श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी, असे मत हभप शिवाजी महाराज देशमुख यांनी व्यक्त केले.
संत सावता माळी उत्सव समितीच्यावतीने गेल्या सात दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप नेवासा येथील हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. याप्रसंगी उत्सव समितीचे प्रमुख छबुनाना जाधव, विश्वनाथ राऊत, हभप जालिंदर महाराज निकम, हभप बाळकृष्ण महाराज खेसे, हभप सुनीता महाराज मोकाटे आदी उपस्थित होते.
काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाची व्यवस्था माळीवाडा पंच मंडळ देवस्थानच्यावतीने करण्यात आली होती. सप्ताहासाठी सहकार्य करणार्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान काल सावता माळी पुण्यतिथीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीचा शुभारंभ आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर सुरेखा कदम यांनीही या मिरवणुकीचे स्वागत केले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अँड़ अभय आगरकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अशोक कानडे, शिवाजी कदम, अविनाश घुले, विजय कोथिंबीरे आदींसह संत सावतामाळी भजनी मंडळ व कपिलेश्वर भजनी मंडळ आदी सहभागी झाले होते.









