Archive Pages Design$type=blogging

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमीपूजन मुकुंदनगर भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार

प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमीपूजन मुकुंदनगर भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार अहमदनगर ; मुकुंदनगरसाठी मंजूर झालेला निधी द...


प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमीपूजन
मुकुंदनगर भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार
अहमदनगर ;
मुकुंदनगरसाठी मंजूर झालेला निधी दुसरीकडे वर्ग करण्याच्या सत्ताधार्‍यांच्या हालचालीकडे नागरिकांनी लक्ष ठेवावे. मंजूर झालेल्या कामांचे फक्त भुमीपूजन न करता जागरूक राहून नागरिकांनी व नगरसेवकांनी काम पुर्ण करुन घ्यावे. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या प्रश्नानंतर लवकरच मुकुंदनगरच्या भाजी मार्केटचाही प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
मुकुंदनगर येथे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून अंदाजे ५३ लाख रुपये खचरून महापालिका राष्ट्रीय शहर नागरी आरोग्य योजनेतंर्गत उभारण्यात येणार्‍या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामाचे भुमीपूजन प्रसंगी आ.जगताप बोलत होते. 
यावेळी नगरसेवक फैय्याज शेख, मुकुंदनगर विकास समितीचे अध्यक्ष अर्शद शेख, कादीर सर, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती नसिम शेख, डॉ.संदीप सुराणा, निखिल वारे, नगरसेवक आरिफ शेख, संपत बारस्कर, संजय घुले, मुजाहिद कुरेशी, अय्युब शेख, माजी आर.टी.ओ. शहा, अफजल सय्यद, संभाजी पवार आदि उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले की, मुकुंदनगरचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. मतदारा पर्यंन्त केलेली विकासात्मक कामे पोहचविण्यासाठी नगरसेवकांनी माहिती पत्रके छापून घरोघरी वाटावी. यामुळे नागरिकांना झालेल्या कामाची माहिती मिळणार आहे. पहिल्यांदा महापौरपदी निवड झाली असता मुकुंदनगरमध्ये नगरोत्थानच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावली. प्रास्ताविकात नगरसेवक शेख म्हणाले की, मुकुंदनगर येथे ईस्लामी बेकरी समोरील ओपन स्पेसमध्ये उभारण्यात येणार्‍या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला अंदाजे ५३ लाख रुपये खर्च येणार असून, बांधकामाचा कालावधी सहा महिने आहे. यामध्ये १.५0 के.बी. हायब्रीड सोलर सिस्टीम व अग्नीशमनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त लवकरच मुलांसाठी व्यायाम शाळा व ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उबेद शेख यांनी केले. फैय्याज शेख यांनी आभार मानले

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमीपूजन मुकुंदनगर भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार
प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे भुमीपूजन मुकुंदनगर भाजी मार्केटचा प्रश्न मार्गी लावणार
http://epunyanagari.com/epaperimages/12082016/12082016-md-ah-17-2168-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_312.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_312.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago