जीप झाडावर आदळून पाच ठार तिरुपतीला जाताना अपघात; सोनपेठवाडीवर शोककळामुखेड (नांदेड) : सीमा आंध्रातील जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती...
जीप झाडावर आदळून पाच ठार
तिरुपतीला जाताना अपघात;
![]()
सोनपेठवाडीवर शोककळामुखेड (नांदेड) : सीमा आंध्रातील जगप्रसिद्ध देवस्थान तिरुपती येथे देवदर्शनासाठी जाणारी जीप झाडावर आदळल्याने पाच भाविक ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. तेलंगणात झालेल्या या अपघाताने तालुक्यातील सोनपेठवाडी गावावर शोककळा पसरली आहे. जखमीवर संगारेड्डी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुखेड तालुक्यातील सोनपेठवाडी व होळगंडवाडी येथील भाविक ९ ऑगस्ट रोजी पहाटे क्रुझर जीप क्रमांक एमएच-२६-एम-४१६0 या वाहनाने आंध्रातील तिरुपती देवस्थानला दर्शनासाठी निघाले होते. ९ रोजी पहाटे ही जीप तेलंगणातील संगारेड्डी ते जोगीपेठ दरम्यान असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, जीपच्या धडकेने झाड कोसळले. तसेच गाडी चक्काचूर झाली. या अपघातात संजय राठोड-३४, सौ.लक्ष्मीबाई संजय राठोड-२८,आई कुलाबाई राठोड-६0, भाऊ दिलीप राठोड सर्व रा.सोनपेठवाडी ता.मुखेड हे जागीच ठार झाले. जीप चालक नरसिंग ज्ञानोबा श्रीरामे याला उपचारासाठी हैदराबादला नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघातात सात जण गंभीर
|










