शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी हवी : कावरे पाथडी ; ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संधी मिळण्याची वाट ...
पाथडी ;
ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संधी मिळण्याची वाट न पाहता त्यांचा शोध घेवून स्पर्धा परीक्षेची तयारी शालेय जिवनापासूनच करावी, असे आवाहन प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी केले. तालुक्यातील तोंडोळी येथे श्रीहरिहरेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व पालकांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या .
या वेळी प्रमुख पाहुणो म्हणून पावन गणपती प्रतिष्ठानचे संस्थापक पांडुरंग महाराज झुंबड, माजी सरपंच रामकिसन भिसे , रामनाथ भराट, ज्ञानेश्वर वारुंगळे, उपसरपंच श्रीधर भराट, शिवाजी देशमुख, ज्ञानदेव पडळकर , बबन आठरे आदी उपस्थित होते. या वेळी कावरे म्हणाल्या, कोपर्डीसारख्या घटनांमुळे ग्रामीण भागात विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होवून विद्यार्थी विशेषत : मुली शिक्षणांपासून दुरावण्याचे प्रकार घडू नयेत म्हणून पालकांनी अधिक जागृक राहावे. विद्यार्थिनींनी ज्युदो कराटे व अन्य प्रकारचे स्वसंरक्षणाचे शिक्षण घ्यावे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, अशी खुणगाठ मनाशी बांधूनच पुढे वाटचाल करावी . जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात शिस्त व परिश्रम यशासाठी आवश्यक आहेत. लहान वयात छोटया छोटया गोष्टींची लागलेली शिस्त उच्च पदावर पोहचण्यासाठी महत्वाची ठरते, असे कावरे म्हणाल्या. प्रास्ताविक अण्णासाहेब नाकाडे यांनी केले. मुख्याध्यापक राजेंद्र मरकड यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रकाश जाधव यांनी केले. पांडुरंग चव्हाण यांनी आभार मानले










