अन्यथा नागरिकांचा आंदोलनाचा इशारा मुकुंदनगर येथील रस्त्याचे काम त्वरित सुरू करा; अल्पसंख्याक प्रभाग असल्याने दप्तर दिरंगाई ग...
अन्यथा नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
मुकुंदनगर येथील रस्त्याचे काम त्वरित सुरू करा;
![]()
अल्पसंख्याक प्रभाग असल्याने दप्तर दिरंगाई
गेल्या अनेक वर्षाच्या सतत जनअंदोलनातून हा निधी उपलब्ध झाला आहे. परंतू प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईमुळे गेल्या सहा वर्षाच्या विक्रमी कालावधीत निधी असुन देखील या रस्त्याचे काम पुर्णतर सोडा, सुरुच झाले नाही. निधी उपलब्ध असताना देखील हेतु पुरस्सर विलंबामुळे नागरीकात प्रशासनाच्या हेतूबद्दल शंका निर्माण होत आहे. अल्पसंख्याक प्रभाग असल्यामुळे निधीअसुन देखील काम न करण्याचा प्रशासनाचा हेतू स्पष्ट होताना दिसत आहे.
- अर्शद शेख, अध्यक्ष, मुकुंदनगर विकास कमिटी.शरीफ व दमबारा हजारी यांच रस्त्यावर स्थित असल्यामुळे शेकडो भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही कामे १५ ऑगस्टपर्यंत सुरु न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. आयुक्तांनी उपस्थिताना ही कामे लवकरच सुरु करु असे आश्वासन दिले.कालावधी उलटून गेला असून देखील प्रत्याक्षात या कामाची कोणतीच प्रगती झालेली नाही. अतिक्रमण विभागाने गेल्या तीन महिन्यापुर्वी अतिक्रमणो काढलेली आहेत. अनेक वर्षापासुन मुकुंदनगरचे रहिवाशी अत्यंत खराब रस्त्यामुळे नरकमय यातना भोगत आहेत. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या भागातील नागरीकांना अनेक आजार झाले आहेत. ऐतिहासीक दर्गा शाहअहमदनगर प्रतिनिधी
औरंगाबाद रोड हायवेवरील जुने ग्रामपंचायत ऑफीस ते संजोगनगर रस्त्याचे रुंदीकरणसह डांबरीकरणचे कामे त्वरीत करण्यात यावे याबाबतचे निवेदन मुकुंदनगर विकास कमिटीच्यावतीने महापालिकेचे आयुक्त दिलीप गावडे यांना देऊन चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी कमिटीचे अध्यक्ष अर्शद शेख, इस्माईल पठाण, सलिम साहारा, अन्सार सय्यद, हनिफ तांबोली, वसीम शेख, शोऐब सय्यद, मोसीन सय्यद, नासिर शेख, हूसेन गोलंदाज, हसन सय्यद, तनवीर शेख, सलिम सय्यद आदिंसह मुकुंदनगर येथील रहिवासी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र सुवर्णजंयती नगरोत्थान महाभीयन योजने अंतर्गत गेल्या सहा वर्षापासुन प्रलंबित जुने ग्रामपंचायत ते संजोगनगर रस्त्याची निविदा प्रक्रिया पुर्ण होवून १ मार्च २0१६ रोजी मे.ए.सी.कोठारी यांना कार्यारंभ आदेश (क्र. ६0१) देण्यात आले.
|










