.'एमआयडीसी'तील नवृत्त कर्मचार्यांचा सत्कार; अहमदनगर ; इंडियन सीमलेस कंपनीतील कर्मचारी सुधाकर एडके, केएसपी कंपनीतील बी. सी...
.'एमआयडीसी'तील नवृत्त कर्मचार्यांचा सत्कार;

अहमदनगर ;
इंडियन सीमलेस कंपनीतील कर्मचारी सुधाकर एडके, केएसपी कंपनीतील बी. सी. राऊत, क्रॉम्प्टन कंपनीतील आनंदा काळेकर, रयत शिक्षण संस्थेतील भाऊसाहेब गहिरे यांचा सेवानवृत्तीबद्दल कंपनी व ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. माजी सभागृहनेते अशोक बडे यांच्या हस्ते सत्कार झाला. कंपनीचे जनरल मॅनेजर प्रताप कपूर, अतुल भोसले, व्ही. एस. साने, वसंत एडके, लिलाबाई एडके, हभप तुकाराम कातोरे, भाऊसाहेब खेडकर, राजाभाऊ पोतदार, संदीप कुलकर्णीे आदी उपस्थित होते.
एडके म्हणाले, माझी सेवानवृत्तीप्रसंगी आई-वडिलांची वाजतगाजत रथातून सवाद्य मिरवणूक काढावी, हे मी मनोमन ठरविले होते. ती मनोकामनेची पूर्तता झाली. सीमलेस कंपनीत २७ वर्षे नोकरी केली. या काळात अनेक चांगले वाईट अनुभव इतरांना येतात, ते मलाही आले. यापुढील काळात सामाजिक कार्यात स्वत:ला वाहून घेऊन समाजाची सेवा करणार आहे.'एमआयडीसी'तील नवृत्त कर्मचार्यांचा सत्कार









