फिडरच्या निधीसाठी शहर भाजप राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार; अहमदनगर ; उपमहापौर छिंदम यांनी पाणीपुरवठय़ावरून महापालिका प्रशा...
|
फिडरच्या निधीसाठी शहर भाजप
राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार;
अहमदनगर ;
उपमहापौर छिंदम यांनी पाणीपुरवठय़ावरून महापालिका प्रशासनाला धरले धारेवर नागरिकांचे सेवेकरी असल्याचे भान ठेवा
शहरात विस्कळीत होणार्या पाणी पुरवठ्याबाबत मनपा अभियंत्यांच्या बैठकी सातत्याने खंडीत होणार्या वीजपुरवठय़ाची बाब पुढे आल्यानंत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळासह महावितरणचे शहर उपअभियंता सुधाकर जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. पाणीपुरवठा यंत्रणेला पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
वीज कंपनीचे अभियंता जाधव म्हणाले, तांत्रिक बाबींमुळे विद्युत पुरवठा खंडीत होत असतो. मनपाने जर स्वतंत्र फिडर उभारले, तर पाणीपुरवठा योजनेस पूर्ण क्षमतेने व अखंडीत विद्युत पुरवठा सुरू राहिल. मात्र नवीन फिडरसाठी चार कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे. मनपाने जर निधी उपलब्ध करुन दिला, तर हा प्रश्न मार्गी लागू शकतो.
खासदार दिलीप गांधी यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे या फिडरच्या निधीसाठी पाठपुरावा करू, असे उपमहापौर छिंदम यांनी सांगितले. मनपा प्रशासन व महावितरण अधिकारी यांची संयुक्तीक बैठक होणो आवश्य़क असल्याने छिंदम यांनी स्पष्ट करत पुढील आठवड्यामध्ये बैठकीचे नियोजन करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. जाधव यांनी देखील शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या मुद्यांना सकारात्मक प्रतिसाद देत मनपा प्रशासनाने दर आठवड्याला बैठक घेतल्यास प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहू, अशी ग्वाही दिली. त्याचबरोबर पाणी पुरवठय़ाचा सातत्याने खंडित होणार्या वीजपुरवठय़ाबाबतचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सहकार्य करु, असे सांगितले.
या शिष्टामंडळात शहर चिटणीस किशोर बोरा, श्रीकांत साठे, उपाध्यक्षा संगीता खरमाळे, गौमत दीक्षित, नगरसेवक बाबा वाकळे, मालण ढोणो, नितीन शेलार, अन्वर खान, माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र कुलकर्णी, संजय ढोणो, उमेश साठे, नितीन जोशी, अभिजित चिप्पा, धनंजय जामगांवकर, शशिकांत पालवे, मिलिंद भालसिंग, अविशान साकला, शरद ठुबे, अज्जु शेख, सतिष शिंदे आदी उपस्थित होते
शहरात दोन महिन्यांपासून विस्कळीत आणि गढूळ पाणीपुरवठय़ाच्या तक्रारीवरून उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेच्या अधिकार्यांचा चांगलेच धारेवर धरले. नागरिकांचे आपण सेवेकरी आहोत, याचे भान ठेवा. नागरिकांच्या तक्रारी वाढल्या तर कारवाईला समोरे जावे लागेल, असा इशारा उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी दिला. छिंदम यांनी पाणी पुरवठय़ाबाबत होत असलेल्या तक्ररारींवरून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची तातडीची बैठक घेतली. त्यात त्यांनी हा इशारा दिला.
छिंदम यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच शहरात विस्कळीत झालेला पाणीपुरवठा व गढूळ पाण्यांबाबत अधिकार्यांवर प्रश्नांचा मारा केला. यात सुधारणा कधी होणार याबाबत विचारात अधिकार्यांचा अपेक्षीत असा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून छिंदम यांनी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरात सातत्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न यातून गंभीर होऊ शकतो. लोकप्रतिनिधींकडे याबाबतच्या तक्रारी वाढल्या आहेत. शहरात पहाटे सुटणारे पाणी वारंवार विस्कळीत होत आहे. याबाबत रात्री-अपरात्री नागरिक थेट तक्रारी करत आहेत. मनपा प्रशासन याबाबत दखल का घेत नाही? दररोज येणारे गढूळ पाणी कशामुळे येते याबाबतचे कारण शोधून काढा. स्वच्छ पाणीपुरवठय़ासाठी काय उपाययोजना करता येईल, त्या सुचवा. त्यावर तातडीने कार्यवाही केली जाईल, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
|










