बोल्हेगाव येथे राघवेंद्रस्वामी आराधना उत्सव कार्यक्रम अहमदनगर ; बोल्हेगाव (राघवेंद्र स्वामीनगर) येथे सालाबादप्रमाणे २६ वा राघवे...
बोल्हेगाव येथे राघवेंद्रस्वामी आराधना उत्सव कार्यक्रम
![]()
अहमदनगर ;
बोल्हेगाव (राघवेंद्र स्वामीनगर) येथे सालाबादप्रमाणे २६ वा राघवेंद्र स्वामी आराधना उत्सव येथील श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर व येथील समस्त गुरुबंधू-भगिनींच्यावतीने साजरा होणार आहे. श्रावण वद्य प्रतिपदा ते तृतीया असे तीन दिवसाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १९ रोजी नगर शहरात पालखी कार्यक्रम होईल. सकाळी ठिक १0 वाजता श्री स्वामी राघवेंद्रनाथ यांची पालखी श्री मार्कंडेय मंदिर येथून कापड बाजारमार्गे निघून परत मिरवणुकीनेच मार्कंडेय मंदिरात येऊन विसर्जित होईल. त्याच दिवशी रात्री ९ ते ११ येथील श्री नवनाथ देवस्थान सेवा मंडळ संचलित श्री राघवेंद्र स्वामी विद्या निकेतन व श्री देवेंद्रनाथ माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. दि. २0 रोजी राघवेंद्रस्वामी रथ मिरवणुकीचा कार्यक्रम सकाळी १0 ते १२ वाजेपर्यंत मंदिर ते नगर-मनमाड रोड बोल्हेगाव फाट्यापर्यंत होईल. रात्री भारूड सादर कर्त्यांचा भारूडाचा कार्यक्रम रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत होईल. दि. २१ रोजी सकाळी १0 ते १२ सत्संग व समारोप कार्यक्रम होईल. विविध कार्यक्रमांनी होणार्या आराधना उत्सव कार्यक्रमास तन-मन-धनाने सामील व्हावे असे आवाहन श्री नवनाथ देवस्थान सेवा ट्रस्ट, बोल्हेगाव व समस्त गुरू बंधू-भगिणींच्यावतीने भाविक-भक्तांना करण्यात आले आहे.
|










