कुकडी व घोडच्या आवर्तनासाठी ४ ऑगस्टला मंत्रालयात बैठक: पाचपुतेआढळगाव; कुकडी व घोडचे आवर्तन सोडण्यासाठी गुरुवार, दि. 4 ऑगस्टला मंत्रालय...
कुकडी व घोडच्या आवर्तनासाठी ४ ऑगस्टला मंत्रालयात बैठक: पाचपुतेआढळगाव; कुकडी व घोडचे आवर्तन सोडण्यासाठी गुरुवार, दि. 4 ऑगस्टला मंत्रालयात बैठक होणार असल्याची माहिती माज़ीमंत्री पाचपुते यांनी दै. पुण्यनगरीशी फोनवरून बोलताना दिली. याबाबत अधिक माहिती देताना पाचपुते म्हणाले की, कुकडी प्रकल्पात सध्या चांगला पाऊस पडत असून, कुकडीच्या येडगाव व वडज या धरणांमधून 20 हजार क्युसेक्सने घोड धरणात आज दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत आपणाला माहिती समजताच आपण आज मुबईला येऊन संबंधीत मंत्र्यांना भेटलो. व श्रीगोंदा,कर्जत,जामखेड,पारनेर या तालुक्यांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे तातडीने घोड व कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबत आज त्यांना सांगितले. आपण याबाबत आजपर्यंत तीनवेळा पत्रव्यवहार केला आहे. गुरुवार, दि. 4 ऑगस्ट रोजी हे आवर्तन सोडण्याबाबत मुबईला मंत्रालयात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. ते म्हणाले की, धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास आज रात्री किंवा उद्यापासून बैठकीपूर्वीच कुकडी व घोड धरणातून पाणी सोडले जाऊ शकते. पाचपुते यांनी सांगितले की,काम न करता श्रेय घेण्यात आमदारांना रस आहे. आपण धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडत असल्याची माहिती समजताच मुबईला जाऊन घोड व कुकडीचे आवर्तन सोडण्याबाबत संबंधित मंत्री व अधिकार्यांना भेटून आवर्तन सोडण्याची मागणी केली. त्यामुळेच गुरुवारी बैठक होत आहे. परंतु तालुक्यातील विरोधक फक्त श्रेय घेण्यासाठी पत्रकबाजी करत आहेत. काम न करता श्रेय घेण्यात त्यांना रस आहे, अशी टीका पाचपुते यांनी आ.जगताप यांच्यावर केली. |










