Archive Pages Design$type=blogging

जिप्सी प्रतिष्ठानतर्फे महामंडळाच्या नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार

जिप्सी प्रतिष्ठानतर्फे महामंडळाच्या नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार; 'नगरमध्ये चित्रपट महामंडळाचे कार्यालय सुरू करणार' अहमदनगर ...


जिप्सी प्रतिष्ठानतर्फे महामंडळाच्या नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार;
'नगरमध्ये चित्रपट महामंडळाचे कार्यालय सुरू करणार'
अहमदनगर ;
पुणो, मुंबई, कोल्हापूरपर्यंत चित्रपट महामंडळ र्मयादीत होते. आता मात्र राज्यभर फिरून रंगकर्मींच्या अडचणी समजून घेण्यासाठी संपर्क सुरु करणार आहे. त्यातून नगरमध्ये पुढील महिन्यात कार्यालय सुरू होईल, अशी घोषणा चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी केली. जिप्सी प्रतिष्ठानतर्फे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नवर्निवाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार व स्नेहमेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. 
अध्यक्ष मेघराज राजेभोसले, उपध्यक्ष धनाजी यमकर, कार्याध्यक्ष रणजीत जाधव, जेष्ठ संचालक सतीश बिडकर, खजिनदार संजय ठुबे आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. सिने अभिनेता प्रकाश धोत्रे, ज्येष्ठ रंगकर्मी मकरंद खेर, पी. डी. कुलकर्णी, नाट्यलेखक सदानंद भणगे, दीपक घारू, संतोष पोटे, बापू चंदनशिवे, क्षितिज झावरे, अंजली देवकर, अशोक अकोलकर, नाना रसाळ (अकोले), रघुनाथ आंबेडकर (पारनेर), विलास कुलकर्णी (राहुरी), प्रकाश ढोणो (श्रीरामपुर), अविनाश बोधले (जामखेड), महेन्द्र म्हस्के (बीड) व हे यावेळी उपस्थित होते. 
महामंडळाचे अध्यक्ष राजेभोसले यांनी आता पेपरलेस काम करून ऑनलाइन सभासद नोंदणी करणार आहे, असे सांगून सध्या कलाकारांची मोठ्या प्रमाणात फेक ऑडीशनद्वारे फसवणूक होत आहे. या गोष्टींना थांबविण्यासाठी मोबाइल अँप सुरु करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. शशिकांत नजन यांनी प्रास्ताविक केले. सदानंद भणगे, पी.डी. कुलकर्णी यांची यावेळी भाषणे झाली. रवी उंडाले, श्रेणिक शिंगवी, प्रशांत जठार, स्वप्नील नजन, अनंत रिसे, सचिन क्षीरसागर, संकेत लांडे, मुख्तार शेख, अर्चना खरपुडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश धोत्रे यांनी आभार मानले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जिप्सी प्रतिष्ठानतर्फे महामंडळाच्या नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार
जिप्सी प्रतिष्ठानतर्फे महामंडळाच्या नवीन पदाधिकार्‍यांचा सत्कार
http://epunyanagari.com/epaperimages/01082016/01082016-md-ah-17-1457-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_36.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_36.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago