भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ अहमदनगर ; स्वातंत्र्यदिनानिमित्त लक्ष्मी कारंजा येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्य...
भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
अहमदनगर ;
![]()
स्वातंत्र्यदिनानिमित्त लक्ष्मी कारंजा येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात शहर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते ध्वजारोहन झाल्यावर त्यांनी उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्यांना स्वच्छतेची, वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ दिली.
गांधी म्हणाले, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्यांना अभिवादन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मिळालेले स्वातंत्र्य अब्यिधत राखणो हे देखील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाज कार्यात पुढाकार घेऊन आपआपल्या परिसरातील प्रश्न व समस्या मार्गी लावण्यासाठी पाठपुरवठा करावा. हे करताना परिसर स्वच्छ ठेवावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसामान्य जनतेकरीता सुरू केलेल्या योजना जनतेपर्यंत पोचवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवावा, असे देखील त्यांनी सांगितले
|










