प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सर्वसाधारण सभेची तयार अहमदनगर ; सत्ताधार्यांचे अभ्यासपूर्ण नियोजन सुरू, तर गुरूकुल आक्र...
प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या सर्वसाधारण सभेची तयार अहमदनगर ; सत्ताधार्यांचे अभ्यासपूर्ण नियोजन सुरू, तर गुरूकुल आक्रमक
सत्ताधारी व विरोधकांचा सराव अभ्यास
सभासदांची पिळवणूक थांबवा : इब्टा
सत्ताधार्यांनी सभासदांची पिळवणूक सुरू केली असल्याचा आरोप इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशन प्रणित (इब्टा) बहुजन मंडळाचे अध्यक्ष भागवत लेंडे व इब्टाचे सचिव एकनाथ व्यवहारे यांनी केला आहे. सभासदांना सुलभरित्या आणि जलदगतीने कर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सत्तेत येताना दिले गेले होते. त्याचे पालन होत नसल्याचा आरोप इब्टाचा आहे. सभासदांच्या तक्रारींचे निवारण योग्य होत नाही. संचालक मंडळ बॅंकेचे आणि सभासदांचे हित पाहण्याऐवजी स्व: हितात गुंतले आहे. अपंग शिक्षकांना कर्ज मिळविताना होत असलेली हेळसांड ही बाब देखील इब्टा दुर्लक्षित करणार नाही. बॅंकेच्या पोटनियम दुरुस्तीबाबत सत्ताधार्यांनी सभासदांचा विश्वासघात केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा व्यवहारे यांनी दिला
शिक्षक बॅंकेत सत्तातंर होऊन पहिल्यादाच सत्तेत आलेल्या गुरूमाऊली मंडळाला बॅंकेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत घेरण्यासाठी विरोधकांना जोरदार मोर्चे बांधणी करण्यास सुरूवात केली आहे. सत्ताधार्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यापासून कोणत्या मुद्यात पकडता येईल, यावर विरोधकांनी माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली आहे. विरोधकांच्या या भूमिकेविषयी सत्ताधारी देखील गाफिल नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विरोधकांना जशास तसे उत्तर देण्याची तयारी सत्ताधार्यांनी येणार्या बॅंकेच्या वार्षिक सभेच्या निमित्ताने सुरू केली आहे.
गुरूकुल मंडळाच्या पदाधिकार्यांना सत्ताधार्यांना घेरण्यासाठी विविध मुद्यांचा अभ्यास सुरू केला आहे. गुरुकुलच्या पदाधिकार्यांनी त्यासाठी रविवारी (ता. ३१) बैठक घेऊन त्याचे नियोजन केले. स्वच्छ कारभाराच्या नावाखाली सभासदांना तीन महिन्यातच लाखो रुपयांना दिलेल्या भुर्दंडाचा हिशोब या सभेत घेऊच, असा पावित्रा गुरूकुलने घेतला आहे. संजय धामणे, सुनील बनोटे, विजय महामुनी, लक्ष्मण चेमटे, किशोर हारदे, किरण दहातोंडे, सुनील शिंदे यांनी यासंदर्भात बैठकीनंतर प्रसिद्ध पत्रक काढले आहे. सभासदांची पिळवुणीबरोबरच कारभारात समन्वय नसल्याचा आरोप धामणे यांनी यावेळी केला.
अंशदायी पेन्शन लागू झालेल्या शिक्षकांच्या ठेवीत बॅंकेने कपात करण्यास सुरूवात केल्याने नाराजी आहे. पगारातील एक रुपया देखील कपात करून देणार नाही अशी भूमिका घेण्यात आली आहे. सरकार या शिक्षकांचे सहा हजार रुपये महिन्याला कपात करत आहेत. त्यामुळे या शिक्षकांसमोर आर्थिक अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. त्यात शिक्षक बॅंकेने ठेवीत कपात करण्यास सुरूवात केली आहे. बॅंकेने या शिक्षकांच्या मागे उभे राहण्याऐवजी त्यांना वार्यावर सोडून देण्याचे ठरवले आहे. पण, गुरूकुल मंडळ असे होऊ देणार नाही, असा इशारा सत्ताधार्यांना धामणे यांनी दिला आहे. वार्षिक सभेत ठेववाढीचा पोटनियम दुरुस्तीला टाकल्यास त्याचे परिणाम देखील भोगावे लागतील, असे देखील ते म्हणाले. याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे नियमानुसार तक्रार करून लढा देणार असल्याचा इशारा देखील धामणे यांनी दिला.










