अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना कॉंग्रेसतर्फे अभिवादन नेप्ती येथे आदरांजली; अहमदनगर; साहित्यर▪अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती...
अण्णाभाऊ साठे व लोकमान्य
टिळक यांना कॉंग्रेसतर्फे अभिवादन
नेप्ती येथे आदरांजली;
अहमदनगर;
साहित्यर▪अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, तर लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर ब्लॉक कॉंग्रेस समितीतर्फे अभिवादन करण्यात आले. ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, महिला अध्यक्षा सविता मोरे, जिल्हा सरचिटणीस उबेद शेख, शहर जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना चमडेवाला, डी. जी. भांबळ, संध्या मेढे, कौशल गायकवाड, दिलीप सकट, बाळासाहेब पवार, शारदा पवार, हनीफ शेख, फिरोज खान, डॉ. जहिदा शेख, हलीमा शेख आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा कॉंग्रेस कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त, तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.नेप्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहण्यात आली. मीना जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करण्यात आला. एकनाथ व्यवहारे हे अध्यक्षस्थानी होते. स्वच्छता आणि पाणी बचतीचा संदेश देत टिळक आणि साठे यांच्या चरित्रावर उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी ग्रामस्थांच्यावतीने खाऊचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक हिरा सोनवणे, रामदास फुले, संजय जपकर, आबा लोंढे, रखमा जपकर, मीना जाधव, रंजना गाडीलकर, राजश्री कोल्हे, मंदा इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.










