राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक; पाण्यासाठी दाहीदिशा भटकणार्या लातूरकरांसाठी शनिवारचा पाऊस दिलासादायक ठरला. या पावसामुळे मांजरा नदीव...
राज्यात पावसाचे जोरदार कमबॅक;

पाण्यासाठी दाहीदिशा भटकणार्या लातूरकरांसाठी शनिवारचा पाऊस दिलासादायक ठरला. या पावसामुळे मांजरा नदीवरील नागझरी बंधारा तुडुंब भरला. या बंधार्यातून लातूर शहर व परिसराला पाणीपुरवठा होतो. यामुळे लातूर शहराला तब्बल चार महिन्यानंतर नळाद्वारे पाणीपुरवठा होणार आहे.मुंबई-कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारापुणो : ईशान्य बंगालच्या उपसागर व लगतच्या भागावर क्षेत्र तयार झाल्याने, पुढील ४८ तासांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुणो वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. राज्यात कोकण, मुंबई, मराठवाडा, विदर्भासह सोलापूर, अक्कलकोट, यवतमाळ आदी भागांत जोरदार पाऊस झाला आहे.









