विहिरीत क्रेन कोसल्यामुळे कामगाराचा मृत्यू ; अळकुटी ; पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्यामुळे...
विहिरीत क्रेन कोसल्यामुळे कामगाराचा मृत्यू ;
अळकुटी ;


पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे विहिरीचे काम सुरू असताना क्रेन कोसळल्यामुळे एक कामगार जागीच ठार, तर एक गंभीर
जखमी झाला. जखमीला उपचारासाठी आळेफाटा येथे दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भंडारीवस्ती परिसरात पिंपळगाव जोगा कॅनॉलच्या बाज़ूला एका विहिरीचे खोदकाम चालू असताना क्रेनची वायर तुटून ती विहिरीत कोसळली. यामुळे क्रेनचालक संभाजी जगन धोत्रे व त्याचे वडील जगन धोत्रे हे विहिरीत ओढले गेले. यामध्ये
क्रेनचालक संभाजीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील जगन धोत्रे यांना जबर मार लागला. त्यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे मज़ूर बीड व जालना जिल्ह्यातील आहेत.









