थोरात यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात य...
थोरात यांना दुसर्यांदा राष्ट्रपती पदक

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांचा सन्मान करण्यात आला. अहमदनगर : अंभोरा, ता. आष्टी येथील रहिवासी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामेश्वर मोहनराव थोरात यांना प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींनी दुसर्यांदा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
थोरात सध्या वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. थोरात यांना २00३ मध्ये राष्ट्रपती पदकाने तसेच २00४ मध्ये पोलीस महासंचालक यांनी पदक देऊन गौरविले आहे.
२00७-0८ मध्ये उत्कृ ष्ठ तपास कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार देवून सन्मानित केलेले आहे. त्यांना त्यांच्या कार्यकाळात १0५ प्रशंसापत्र व २५0 अवॉर्डसने सन्मानित करण्यात आलेले आहे. वाळुंज एमआयडीसी पोलीस ठाण्याला त्यांच्या कार्यकाळात जानेवारी २0१६ ला आयएसओ प्रमाणपत्र मिळालेले आहे. त्यांच्या यशाचे आमदार विजय औटी, सहाय्यक सरकारी वकील अनिल सरोदे, अँड अंबादास आमले आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. भि.ना. दहातोंडे व मराठा विद्या प्रसारक संस्थेचे निरीक्षक राष्ट्रपतींचे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते मेजर टी.एन. दहातोंडे यांचे ते भाचे आहे









