स्वामी रामकृष्णानंद महाराज जयंती उत्साहात; अहमदनगर; श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्यावतीने वडगाव गुप्ता रोड येथील रामकृष्ण म...
स्वामी रामकृष्णानंद महाराज जयंती उत्साहात;
अहमदनगर;
![]()
श्री रामकृष्ण विवेकानंद सेवा समितीच्यावतीने वडगाव गुप्ता रोड येथील रामकृष्ण मंदिर येथे रामकृष्ण परमहंसाचे शिष्य स्वामी रामकृष्णानंद महाराज यांची जयंती उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी नागपूर रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी ब्रम्हस्थानंद महाराज व रामकृष्ण मिशन औरंगाबादचे स्वामी विष्णुपादानंद महाराज प्रमुख पाहूणो म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पुणो रामकृष्ण मठाचे स्वामी कृपाघनानंद महाराज यांच्या ह्रद्यस्पश्री भजनाने झाली. भजनात सुयोग उकीरडे यांनी तबल्याची साथ दिली. या प्रसंगी बोलताना स्वामी विष्णुपादानंद महाराज यांनी रामकृष्ण परमहंस व विवेकानंद यांच्या प्रथम भेटीतील संवाद सांगितला. ईश्वर विषयक पाश्चात्य तत्वज्ञ व हिंदु धर्मातील संत यांचा अभ्यास करतांना स्वामी विवेकानंद यांना ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका निर्माण झाली व प्रत्यक्ष ईश्वराला कोणी पाहिले आहे काय? याचा शोध घेत ते वण-वण फिरु लागले. अखेर दक्षिणोश्वरी श्री रामकृष्ण परमहंसाकडे पोहचले व त्यांना विचारले आपण ईश्वराला पाहिले आहे काय? यावर रामकृष्ण परमहंस यांनी क्षणाचाही विलंब न लावता, होय मी तुझ्याइतकेच स्पष्टपणो ईश्वराला पाहिले आहे. आणि तू म्हणत असशील तर तुलाही दाखवून देऊ शकतो. पण त्यासाठी तुला साधना करावी लागेल. ईश्वर ही डोळ्याने पहायची वस्तू नसून, प्रत्यक्ष अनुभूतीची वस्तू आहे. तसे केल्यास तुला नक्कीच त्याची अनुभूती मिळणार असल्याचे सांगितले. यावरुन असे दिसून येते की, आपणही रामकृष्णांनी सांगितलेल्या मार्गाचे अनुसरण केल्यास आपणासही ईश्वराची अनुभूती येऊ शकत असल्याचे त्यांनी सांगितले व श्रोत्यांना साधना करण्याविषयी प्रेरणा दिली.
याप्रसंगी पूज्यपाद स्वामी ब्रम्हस्थानंद यांनी रामकृष्ण परमहंसाचे शिष्य रामकृष्णानंद महाराज यांची माहिती देताना म्हणाले की, आपण संसारात असावे पण संसार आपल्यामध्ये नसावा. जसा जहाज पाण्यात असतो, पण पाणी जहाजात शिरले तर जहाज बुडून जाईल. त्याप्रमाणो संसार करावा पण तो मनात नसावा, संसारात अनासक्तपणो राहण्याचा अभ्यास करावा. त्याने मनाला परमशांती लाभून मन पवित्र होते.
समितीचे सचिव सुनिल होरणो यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.मानसी देव यांनी केले. दत्तात्रय दिघे व विराज आहुजा यांनी उपस्थितांचे आभार मानले
|










