मनपा कर्मचार्यांची पतसंस्था ही कामधेनू : कदम अहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्था ही मनपा कर्मचार्यांची कामधेनू आहे. पतसंस्थेच्या म...
मनपा कर्मचार्यांची पतसंस्था ही कामधेनू : कदम
अहमदनगर

मनपा कर्मचारी पतसंस्था ही मनपा कर्मचार्यांची कामधेनू आहे. पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांना कर्जरूपी मदत पतसंस्थेने केली असून मोठा आधार दिला आहे. आम्ही सर्वजण मनपा कर्मचार्यांच्या पाठीशी आहोत. त्यांनी आपले काम चोखपणो करून नगर शहर अधिक सुंदर व स्वच्छ करण्यासाठी प्रय▪करावेत. आपण सर्वजण मिळून शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने प्रय▪करू, असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.
मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या नूतन महापौर सुरेखा कदम, उपमहापौर श्रीपाद छिंदम व सभागृहनेते अनिल शिंदे यांचा पतसंस्थेचे चेअरमन जितेंद्र सारसर, व्हा. चेअरमन प्रकाश आजबे व ज्येष्ठ संचालक कैलास भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारास उत्तर देताना सौ. कदम बोलत होत्या. यावेळी संचालक विकास गिते, किशोर कानडे, बाळासाहेब पवार, चंद्रकला खलचे, बाळासाहेब गंगेकर, सतीश ताठे, राहुल कोतकर, शेखर देशपांडे, विलास सोनटक्के, व्यवस्थापक राजू गंधे आदी उपस्थित होते. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम व सभागृहनेते अनिल शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी सारसर म्हणाले की, पतंस्थेचा कारभार अत्यंत आदर्श पद्धतीने करीत आहोत. पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद असलेल्या मनपा कर्मचार्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाते आहे. महापालिकेकडे थकित असलेली कर्मचार्यांची देणी लवकर द्यावीत, असे ते म्हणाले.









