सोनवणे यांना महाराष्ट्र विभूषण पुरस्कार; अहमदनगर ; भिंगार येथील सुहास काशिनाथ सोनवणे यांना स्वरकुल चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे यांच्या वत...
सोनवणे यांना महाराष्ट्र विभूषण पुरस्कार;
अहमदनगर ;

भिंगार येथील सुहास काशिनाथ सोनवणे यांना स्वरकुल चॅरीटेबल ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र विभूषण पुरस्कार २0१६ नुकताच महाराष्ट्र साहित्य परिषद, पटवर्धन सभागृह, पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात अभिनेते बंडा जोशी व माजी आ. उल्हास पवार यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी महिला बालकल्याण समिती, पुणेच्या सभापती सौ. निता माळी, उत्तर प्रदेश प्रचार प्रमुख सौ. संगीता तिवारी, आम्ही एकपात्री कलाकारचे अध्यक्षा सौ. उज्जवला कुलकर्णी, स्वरकुल चॅरिटेबल ट्रस्ट, पुणेच्या अध्यक्षा डॉ.सौ. वीणा खाडीलकर, संयोजक बाळासाहब्ेा धंदर, शाहिर शेख आदी उपस्थित होते.
सोनवणे यांनी मुंबई, पुणे, नांदेड, भोपाळ, अहमदनगर या ठिकाणी सामाजिक क्षेत्रातील कामकाज योग्यरितीने केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा मध्यवर्ती बॅंक कर्मचारी व जिल्ह्यातील सर्व समाज बांधव व पै.नानासाहेब डोंगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.









