अतिक्रमणो हटविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक जेऊर/- नगर तालुक्यातील जेऊर (बा.) गावात सीनानदी पात्रातील अतिक्रमणो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी...
अतिक्रमणो हटविण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
|
 |
जेऊर/- नगर तालुक्यातील जेऊर (बा.) गावात सीनानदी पात्रातील अतिक्रमणो हटविण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.जेऊर गावाच्या सीनानदी पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली असून, प्रशासनाकडून अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे. सीना नदीपात्रातील मुख्य बाजारपेठ संपूर्ण अतिक्रमणात आहे. अतिक्रमणांमुळे गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सीनानदीला पात्रच राहिले नाही. शनिवारचा आठवडे बाजार जागेअभावी घाणीच्या साम्राज्यात भरावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याचा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. ससेवाडी ग्रामस्थांचेही रस्त्याअभावी हाल होत आहेत. अतिक्रमण सीनानदी पात्रात असल्याने भविष्यात पुरामुळे येथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारात येत नाही. या समस्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. गावामधील अतिक्रमणाला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचा शासनाचा आदेश असला तरी गावातील सरपंच व सदस्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाकडून अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यापलीकडे कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस अतिक्रमणांमध्ये वाढच होत आहे. सध्यातर सीनानदी पात्रातील मुख्य रस्त्यावरच डबर टाकून रस्ता ()करण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून प्रत्येक ग्रामसभेत अतिक्रमणे काढून घेण्याबाबत चर्चा करून अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येतो ; परंतु पुढे काहीही कारवाई होत नसल्याचा इतिहास आहे. अतिक्रमण धारकांना याची सवय झाल्याने तेही बिनधास्त राहून दिवसेंदिवस अतिक्रमणात वाढच करत आहेत. अतिक्रमणांबाबत ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटोळे यांनी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. गावासाठी भविष्यात होणारा धोका ओळखून ग्रामपंचायत कार्यालाने ठोस निर्णय घ्यावा. वेळप्रसंगी महसूल अधिकारी व पोलिस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणो हटवून गावाचा मोकळा श्वास घेऊ देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अतिक्रमण हटविण्याबाबत निर्णय घेण्यात येतो बंदपोलिस बंदोबस्तात सर्व अतिक्रमणो हटवून गावाचा मोकळा श्वास घेऊ देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. |