म्हस्के विद्यालयाच्या खेळाडूंची पुणे विभागीयस्तरावर निवड ; अहमदनगर; क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधि...
म्हस्के विद्यालयाच्या खेळाडूंची पुणे विभागीयस्तरावर निवड ;
अहमदनगर;

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, अहमदनगर व महानगरपालिका आयोजित जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये मुलांच्या १७ वर्ष वयोगटात जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचालित काकासाहेब म्हस्के माध्य.उच्च माध्यमिक विद्यालय व रेणाविकर विद्यालय यांच्यात अंतिम सामना खेळाला गेला. या सामन्यात काकासाहेब म्हस्के विद्यालयातील संघाने मोठय़ा फरकाने सामन्यात विजय मिळवला. या संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या संघाचे नेतृत्व हर्षल गुंजाळ, मयुर म्हस्के, पवार रोहित, सिद्धेश्वर खाडे, हिमांशू वीर, विनायक धनवडे, निखिल शर्मा, ज्ञानेश्वर फुंदे, आकाश अभंग, विशाल नाकाडे, सूरज सोनवणे, प्रतीक हेंद्रे यांनी केले. विजयी संघास क्रीडा शिक्षक नितीन म्हस्के व कैलास गुंजाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले, आमदार चंदशेखर घुले, संस्था विश्वस्त क्षीतीज घुले, प्रशासकीय अधिकारी के.के.पवार, संस्था समन्वयक डॉ. रामकिसन सासवडे, जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के, जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी, राज्य क्रीडामार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विद्यालयाच्या प्राचार्या शीतल बांगर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनंदा तनपुरे व सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांनी कौतुक केले आहे.









