कमिशनवाढीसाठी स्वस्तधान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेद शेवगाव; वारंवार मागणी करूनही शासनाकडून कमिशन वाढवून मिळत नसल्याने राज...
कमिशनवाढीसाठी स्वस्तधान्य दुकानदारांचे तहसीलदारांना निवेद
शेवगाव;
![]()
वारंवार मागणी करूनही शासनाकडून कमिशन वाढवून मिळत नसल्याने राज्यातील परवानाधारकांनी स्वस्तधान्य दुकानदार व रॉकेल विक्रेत्यांनी धान्य व करोसिनचा कोटा न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज श्ॉपकिपर्स फेडरेशन, तालुका संघटनेच्या वतीने तहसीलदार दादासाहेब गीते यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार, हॉकस, किरकोळ केरोसिन परवानाधारक असून, आजतागायत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व योजना अंतर्गत शहर व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य व केरोसिनचे वितरण केले ज़ात आहे.याचा मोबदला मात्र अतिशय अल्प प्रमाणात मिळतो. मोबदला वाढवून मिळण्यासाठी शासनाकडे अनेकवेळा राज्यातील परवानाधारकांच्या अनेक संघटना, महासंघ व ऑल महाराष्ट्र फेडरेशनच्या वतीने राज्य आणि केंद्र सरकारकडे लेखी स्वरुपात निवेदने व बैठका घेवून पाठपुरावा केला; परंतु अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासन निर्णय घेत नाही. यामुळे ऑल महाराष्ट्र फेडरेशनने दि. ४ एप्रिल रोजी आवाहन केल्यानुसार धान्य व केरोसिनची उचल व वितरण करणार नसल्याचे निवदनाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष गजानन बाबर, उपाध्यक्षा मीना कळकुंबे, शाम धूत, संभाजी देहाडराय, बाबा कराड, शैलेश भारस्कर, राज़ू शिनगारे व इतर सदस्यांच्या सह्या आहेत.
|










