मेंदूवरील उपचारासाठी उदयन गडाखांच्या हस्ते चेकचे वितरण खरवंडी :नेवासे तालुक्यातील सोनई येथील युवक राहूल पोपट काळे यांच्या मेंदूवरील...
मेंदूवरील उपचारासाठी उदयन
गडाखांच्या हस्ते चेकचे वितरण
खरवंडी :नेवासे तालुक्यातील सोनई येथील युवक राहूल पोपट काळे यांच्या मेंदूवरील उपचारासाठी मदत म्हणून राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते उदयन गडाख यांच्या हस्ते राहुलची आई मीना पोपट काळे यांच्याकडे रूपये ५ हजारांच्या चेकचे नुकतेच वितरण करण्यात आले.
सोनई येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विश्व विद्यालयाला (ओमशांती केंद्र) उदयन गडाख यांनी दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी येथील प्रवचन तथा मेडीटेशन हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी समारंभात सदर मदतीचा चेक देण्यात आला. यावेळी केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी उषा दिदींनी विद्यालयाच्या कार्याविषयी माहिती देवून उदयन गडाख यांनी एका गरीब कुटुंबातील युवकाच्या मेंदूवरील उपचारासाठी आर्थिक मदत केल्याबद्दल व केंद्राला भेट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी राहुल पवार, परशराम दरंदले, आप्पासाहेब एळवंडे, धनंजय दरंदले, अनिल गडाख, मुळा कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी शंकरराव दरंदले, यशवनतराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक बद्रीनाथ काळे, सविता दिदी आदींसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व ओमशांती परिवारातील सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनार्दन शेटे यांनी केले
| . |










