Archive Pages Design$type=blogging

राहुरीत कांद्याची प्रचंड आवक

राहुरीत कांद्याची प्रचंड आवक ऑगस्ट निम्मा संपला तरी कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने हबकून गेलेल्या शेतकर्‍यांनी साठवणूकीतील...

राहुरीत कांद्याची प्रचंड आवक
ऑगस्ट निम्मा संपला तरी कांद्याचे भाव वाढण्याची चिन्हे दिसत नसल्याने हबकून गेलेल्या शेतकर्‍यांनी साठवणूकीतील उन्हाळी कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरूवात केली आहे. परिणामी दिवसेंदिवस बाजारातील आवक वाढून भाव कोसळत आहेत. या भावामुळे कित्येक शेतकरी खर्चाला महाग झाले. उत्पादन खर्च सोडा पण कांदा विक्रीसाठा नेण्याचा खर्च भागविणेही मुश्किल झाले आहे. उलट शेतातून काढल्या काढल्या ज्यांनी कांदा विकला ते शेतकरी सुखी झाले आहेत.
अन्य प्रांतातील कांदा निघण्यास सुरूवात झाल्याने महाराष्ट्रातील कांदा बाहेर जाईनासा झाला आहे. त्यात नियमनमुक्तीच्या विरोधात व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमुळे शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. महिनाभर कांदा विकलाच गेला नाही. पावसाळी वातावरणामुळे हा कांदा सडला. सरकारने कांदा खरेदी करण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात अजून कोणत्याही हालचाली नाही. सरकार कांदा कधी खरेदी करणार ? याबद्दल निश्‍चित कोणी काही सांगत नाही. या पार्श्‍वभूमीवर अधिक कांदा सडून नुकसान सोसण्यापेक्षा येईल त्या भावात कांदा विकण्याशिवाय शेतकर्‍यांना पर्याय राहिला नाही.
काल राहुरीत ४७६६७ गोण्यांची आवक झाली. भाव ७00 ते १0७७ रुपयापर्यंत निघाले. दोन नंबरचा कांदा ४00 ते ६७५, तीन नंबरच्या कांद्यास १00 ते ३८0 आणि गोल्टी कांद्यास ३00 ते ६५0 रुपयापर्यंत भाव निघाले. गुरुवारी तर कांदा उतरून घ्यायलाही जागा शिल्लक राहिलेली नव्हती. पुढील महिनाभर तरी कांद्याची आवक अशीच वाढती राहणार असल्याचे सांगण्यात आले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राहुरीत कांद्याची प्रचंड आवक
राहुरीत कांद्याची प्रचंड आवक
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgoaRtR-WLukwaMAotswtMhWenHs98B-7hZ4OBTq6q8smtmWIFABfYaOdSawutgSxYBeG4A-Zi7QrMQ9lRM1J3SkEFpECToqvh_gKZ8N5DqReugLw17nEsjBO9RKM00IVCTR0Hm8RRutx5f/s1600/20082016-md-ah-10-853-1-large.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgoaRtR-WLukwaMAotswtMhWenHs98B-7hZ4OBTq6q8smtmWIFABfYaOdSawutgSxYBeG4A-Zi7QrMQ9lRM1J3SkEFpECToqvh_gKZ8N5DqReugLw17nEsjBO9RKM00IVCTR0Hm8RRutx5f/s72-c/20082016-md-ah-10-853-1-large.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_441.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_441.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago