साईसंस्थानात डावलल्याने ना. विखे सर्मथकांचा राहात्यात रास्तारोको; राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांची साईबाबा संस्थान...
साईसंस्थानात डावलल्याने ना. विखे
सर्मथकांचा राहात्यात रास्तारोको;
![]()
राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे यांची साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी नियुक्ती न केल्याच्या निषेधार्थ काल येथे कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करून बंद पाळला.
येथील शिवाजी चौकात सकाळी नगर-मनमाड राज्यमार्गावर कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करून भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदामध्ये समावेश न केल्याने रोष व्यक्त केला. भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. स्थानिक आमदार व नगराध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य आहेत असा उल्लेख घटनेत असतानाही मुख्यमंत्री यांनी घटनाबाह्य काम करून ना. विखे यांची नेमणूक केली नाही. ना. विखे हे भाजप सरकारच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. याची भीती घेऊन त्यांना जाणूनबुजून घेण्यात आले नाही. संस्थानच्या निधीवर अंकुश राहावा. तो इतरत्र खर्च होऊ नये अशी इच्छाही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
ना. विखे यांना विश्वस्त मंडळात सामाविष्ट करावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. सहाय्यक पो.नि. देवीदास पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मोहनराव सदाफळ, गणेशचे अध्यक्ष मुकुंद सदाफळे, नगराध्यक्षा पुष्पा सोमवंशी, कैलास सदाफळ, राजेंद्र कांबळे, संगम बोठे, अँड़ रघुनाथ बोठे, विजय वहाडणे, राजेंद्र निकाळे, दशरथ तुपे, प्रदिप बनसोडढे, संदीप दंडवते आदींची भाषणे झाली.
|










