अमोल घोलप यांची हज़ारे यांच्याशी च र्चा; दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांची लवकरच बैठक : हजारेव्यापक स्वरुपात दारुबंदीच्या लढ्यासाठी जिल्ह...
अमोल घोलप यांची हज़ारे यांच्याशी चर्चा; दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांची लवकरच बैठक : हजारेव्यापक स्वरुपात दारुबंदीच्या लढ्यासाठी जिल्ह्यातील दारुबंदी चळवळीतील कार्यकर्त्यांची आपण लवकरच बैठक आयोजित करू. तसेच राज्याला दिशा देणारी दारुबंदी चळवळ यशस्वी करू, असे आश्वासन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले, अशी माहिती जिल्हा दारुबंदी आंदोलनाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप यांनी दिली. जिल्हा दारुबंदी समितीच्या कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी (दि. ३१) राळेगणसिद्धी येथे दारुबंदी आंदोलनाचे प्रणोते व ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांची भेट घेऊन दारुबंदी आंदोलनांसंदर्भात चर्चा केली. या वेळी हजारे यांनी दारुबंदी चळवळीला गती देणार असल्याचेही सांगितले. या वेळी काही ग्रामसेवक व शासकीय यंत्रणा दारुबंदी ग्रामसभांबाबत सहकार्य करत नसल्याची तक्रार हजारे यांच्याकडे दारुबंदी समितीच्या कार्यकर्त्यांनी केली. शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप यांच्यासह शेवगाव तालुका दारुबंदी समितीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, कारभारी गायकवाड, हातगावचे दारुबंदी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सुसे, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते. चापडगाव (ता. शेवगाव) येथे दारुबंदीचा लढा यशस्वी केल्याबद्दल शेवगाव तालुका दारुबंदी समितीचे सर्व कार्यकर्ते, चापडगावच्या सरपंच संजीवनी गायकवाड, उपसरपंच पंडितराव नेमाणो, तसेच चापडगाव दारुबंदी समितीचे कार्यकर्ते सोमनाथ पातकळ, कृष्णा नेमाणो, कावेरी पातकळ, परमेश्वर पातकळ यांच्यासह पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थांचे अण्णांनी कौतुक केले. तसेच, दारुबंदीच्या जनजागृतीसाठी शेवगाव तालुक्याच्या दौर्यावर आपण सप्टेंबर महिन्यात येऊ, अशी ग्वाही अण्णांनी दिली. शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे महिला व ग्रामस्थांच्या जागृतीमुळे दारुबंदी झाली. तसेच, हातगाव येथे दारुबंदीसाठी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच, उद्या (दि. १ ऑगस्ट ) हातगाव येथे दारुबंदीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आखतवाडे येथेही दारुबंदीसाठी बैठक झाली, अशी माहिती दारुबंदी समितीच्या शिष्टमंडळाने अण्णांना दिली. हातगाव व आखतवाडे गावात ग्रामस्थ व विशेषत: महिलांमध्ये जनजागृती करून दारूची बाटली आडवी होणारच, असा विश्वास शिष्टमंडळाने या वेळी दिला. दारुबंदीसाठी ग्रामसभांच्या आयोजनात सहकार्य न करणार्या ग्रामसेवक तसेच संबंधित शासकीय यंत्रणोवर कडक कारवाई करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, अशी ग्वाही अण्णांनी दिल्याचे अमोल घोलप यांनी सांगितले. कोपर्डीतील चिमुरडीवर अत्याचार करून खून करण्याची दुर्दैवी घटनेची पुनराववृत्ती कोठेही होऊ नये, यासाठी दारुबंदी व मुली - महिलांची सुरक्षितता याबाबत दारुबंदी समितीने कार्य करण्याची महत्वपूर्ण अशी सूचना अण्णांनी केली. |










