द रायजिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात अहमदनगर ; टाकळी काझी येथील द रायजिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये स्वातं...
द रायजिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
अहमदनगर ;

टाकळी काझी येथील द रायजिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथे नव्यानेच नर्सरी व एलकेजीचे वर्ग यावर्षी सुरु करण्यात आले आहेत. माजी शिक्षक मुरलीधर बोरुडे व सैनिक अतुल पवार यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर इंग्लिश गाण्यांची स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. फक्त दोन महिन्यातील मुलांची प्रगती पाहून पालकही भारावून गेले.
या प्रसंगी संचालक अविनाश पवार,बोरुडे सर व सोनू म्हस्के यांनी मनोगत व्यक्त करून शालेय उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी शंकर ढगे, संजय ढगे,शेख, अशोक ढगे, बाबासाहेब निकड्र, संभाजी आटोले, कारगिल अँकॅडमीचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीमती कनोजिया यांनी तर आभार श्रीमती पवार यांनी मानले.









