काटवन खंडोबा येथील अंगणवाडीत स्तनपान सप्ताहाचे उद््घाटन; अहमदनगर; बाळंतपनानंतर पहिले स्तनपान अर्धा ते एक तासात घेणो आवश्यक आहे. यावेळी बाळ...
काटवन खंडोबा येथील अंगणवाडीत स्तनपान सप्ताहाचे उद््घाटन; अहमदनगर; ![]() बाळंतपनानंतर पहिले स्तनपान अर्धा ते एक तासात घेणो आवश्यक आहे. यावेळी बाळाची दूध ओढण्याची क्षमता जास्तीत जास्त असते. स्तनपानाला एक तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास बाळ स्तनपान करण्यास उत्सुक नसते. पहिल्या तीन दिवसात बाळाला नियमित स्तनपान दिल्यास बाळाची प्रतिकार शक्ती वाढत असल्याचे प्रतिपादन सौ. मंगल भुजबळ यांनी केले. जागृती बदुद्देशीय सेवाभावी संस्था व एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने काटवन खंडोबा येथील अंगणवाडी क्रमांक १८ व १९ मध्ये स्तनपान सप्ताहाच्या उद््घाटनाप्रसंगी सौ.भुजबळ बोलत होत्या. पुढे सौ.भुजबळ म्हणाल्या की, बाळाची पहिल्या सहा महिन्यात फक्त आईच्या दुधावरच सवरेत्तम वाढ होते. स्तनपानामुळे बाळाच्या बुध्दीची वाढ होऊन आई व बाळात भावनिक जवळिकता निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंगणवाडी सेविका हिरा ओहोळ यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती दिली. तसेच मुख्यसेविका सौ.कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. |










