शेतकर्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : पाचपुते श्रीगोंद्यात वैरण विकास कार्यक्रमातून ३0६ कडबा कुट्टी मशीनचे वाटपआढळगाव / ...
शेतकर्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा : पाचपुते

श्रीगोंद्यात वैरण विकास कार्यक्रमातून ३0६ कडबा कुट्टी मशीनचे वाटपआढळगाव /
शेतकर्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रय▪करावेत. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रतिभाताई पाचपुते यांनी श्रीगोंदा पंचायत समितीत कडबा कुट्टी मशीन वाटप कार्यक्रमाप्रसंगी बोलताना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती अर्चना पानसरे या होत्या. तर प्रमुख पाहुणो म्हणून पंचायत समितीच्या उपसभापती संध्या जगताप, सदस्य हरिदास शिर्के ,राजेंद्र म्हस्के, अनुराधा ठवाळ , माजी जि .प सदस्य कुंडलिकराव दरेकर, अनिल ठवाळ, गटविकास अधिकरी शिरसाट, सहाय्य्क गटविकास अधिकारी फराटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पाचपुते म्हणाल्या की, शेतकरी सधन व्हावा म्हणून शासन विविध योजना राबवित असते. या योजनांचे प्रस्ताव पाठविण्याचे काम पंचायत समितीचे असते, आपल्या पंचायत समितीतून प्रस्ताव पाठविण्याचे काम अतिशय तत्पर केले जात आहे. म्हणूनच आता तालुक्यांतील ३0६ शेतकर्यांना कडबा कुट्टी मशीनचे वाटप करण्यात येत आहे. शासनाच्या मिळणार्या लाभातून शेतकर्यांनी कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्याचे काम केले पाहिजे असे पाचपुते म्हणाल्या .
तर सभापती अर्चना पानसरे म्हणाल्या की, श्रीगोंदा पंचायत समिती ही सर्वसामान्य नागरिकांना जेवढय़ा शासनाच्या योजना आहेत. त्या देण्यासाठी प्रय▪करीत असते. पंचायत समिती स्तरावरून प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेत मंजूर करण्यासाठी आम्ही सर्व सदस्य प्रय▪करीत असतो. लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वत: चा विकास साधला पाहिजे, अशी अपेक्षा सभापती पानसरे यांनी व्यक्त केली. आज राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून तालुक्यातील ३0६ शेतकर्यांना कडबा कुट्टी मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कर्यक्रमाचे प्रास्ताविक पशु संवर्धन विभागाचे अधिकारी अरविंद उंडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.घोडके, गोपाळे सोमवंशी, घालमे, पुराणो ,गोलांडे, डॉ. बुलाखे तसेच कार्यालयातील खकाळ ,चव्हाण ,विजय माने ,गावडे,काळे ,येरकल आदींनी प्रय▪केले









