जामखेडमध्ये नागपंचमीनिमित्त आनंदनगरी उत्सव जामखेड ; जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रा व नागपंचमी उत्सवानिमित्त भव्य आनंदनगरी...
जामखेडमध्ये नागपंचमीनिमित्त
आनंदनगरी उत्सव
जामखेड ;

जामखेड येथील नागेश्वराच्या यात्रा व नागपंचमी उत्सवानिमित्त भव्य आनंदनगरीत विविध प्रकारच्या खेळण्यांची दुकाने व पाळण्याचे उद््घाटन जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौतम अण्णा उतेकर, उपसभापती शरद काका भोरे, जामखेडचे तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, सर्व संचालक मंडळाच्या हस्ते आज रविवारी करण्यात आले.
यावेळी सभापती, उपसभापती यांच्यासह संचालक पृथ्वीराज वाळूंजकर, महादेव डुचे, सागर सदाफुले,करण ढवळे, अरुण महारनवर, काकासाहेब गज्रे,संचालक पोपट नाना राळेभात,नगरसेवक गणेश आजबे, सिलाभाई शेख, सचिव वाहिदभाई सय्यद, संपत राळेभात, अनिल बाबर, पाळण्याचे मालक महेबूब तांबोळी, आशोक मुळे, ढगे, सदाफुले, चंद्रकांत मोरे, दैनिक पुण्यनगरीचे जामखेड तालुका प्रतिनिधी मोहिद्दीन तांबोळी, पत्रकार आशोक निमोणकर व नागरीक उपस्थित होते.
यावेळी सभापती गौतम अण्णा उतेकर म्हणाले की, जामखेडच्या नागपंचमीची ओळख ही संपूर्ण राज्यात असून या उत्सवासाठी संपूर्ण राज्यातील नागरिक येतात आणि उत्सवाचा आनंद घेतात. तसेच तालुक्यातील नागरिकांनी या आनंदनगरी मध्ये येवून आनंद घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले









