उद्योजक नरेंद्र फिरोदिया : जैन ओसवाल पंचायत व युवक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी तरुणांचा पुढाकार आवश्यक अ...
उद्योजक नरेंद्र फिरोदिया : जैन ओसवाल पंचायत व युवक संघातर्फे गुणवंतांचा सत्कार सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी तरुणांचा पुढाकार आवश्यक अहमदनगर; ![]() आधुनिक युगात साधने, सुविधा वाढल्या आहेत. आर्थिक संपन्नता वाढली. मात्र सामाजिक एकता, प्रत्यक्ष भेटीगाठी कमी झाल्या आहे. अशा परिस्थितीत युवकांनी पुढाकार घेऊन सामाजिक, सांस्कृतिक व बौद्धिक विकासासाठी सर्व समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठीचा प्रय▪केला पाहिजे, असे मत उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केले. जैन ओसवाल पंचायत व जैन ओसवाल युवक संघातर्फे (जॉइज) समाजातील गुणवंतांना त्यांच्या कलागुणांसाठी आयोजित स्नेहउत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण व सत्कार झाला. जैन समाजाचे अध्यक्ष रमेश फिरोदिया, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अशोक पितळे, अशोक बोरा, राजेंद्र चोपडा, अनिल पोखरणा, संजय बोरा, शैलेश मुनोत, कमलेश भंडारी, अमित मुथा, आदेश चंगेडीया, शांतीलाल गुगळे, संजय चोपडा, पोपटलाल कटारिया, मिलापचंद पटवा, पोपटलाल भंडारी, संतोष गांधी, सतीश डुंगरवाल, संदीप गांधी, अनिल मेहेर आदी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, युवकांनी समाजाची खरी गरज ओळखून समाजाला स्नेहउत्सवाच्या व ट्रेड फेअरच्या माध्यमातून एकत्र करण्याचा उपक्रम यशस्वी केला आहे. युवकांनी अशा प्रकारचे उपक्रम सतत राबवावेत त्यांना समाजातील सर्व दानशूर व्यक्तींचे सतत पाठबळ निश्चितच मिळेल. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बुद्धीबळ, बॅडमिंटन, धावणो, कबड्डी, पोहणो, पाककला तसेच विविध स्पर्धातील विजेते खेळाडू, विविध क्षेत्रातील प्रतिभावंत युवक, व्यक्ती तसेच जेष्ठ नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. भूषण भंडारी यांनी प्रास्ताविक केले. माजी अध्यक्ष समीर बोरा व निर्मल गांधी यांनी सुरु केलेला स्नेहउत्सवाचा उपक्रम अध्यक्ष सचिन डुंगरवाल यांनी अधिक उत्तमरीत्या राबवून समाजात वेगळी प्रतिमा निर्माण केली. अभय कटारिया यांनी स्वागत केले. प्रमोद डागा यांनी सूत्रसंचालन केले. महेश भळगट यांनी आभार मानले |










