Archive Pages Design$type=blogging

हातगावच्या ग्रामसभेत बाटली आडवी करण्याचा ठराव

हातगावच्या ग्रामसभेत बाटली आडवी करण्याचा ठराव; शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे आयोज़ित करण्यात आलेल्या महिलांच्या ग्रामसभेत गावतल शासन...


हातगावच्या ग्रामसभेत बाटली आडवी करण्याचा ठराव;
शेवगाव तालुक्यातील हातगाव येथे आयोज़ित करण्यात आलेल्या महिलांच्या ग्रामसभेत गावतल शासनमान्य देशीदारूदुकानाचा परवाना रद्द करून गावात कायमस्वरुपी दारुबंदी करण्यात यावी, असा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. ग्रामसभच्ेया अध्यक्षस्थानी सौ. संगीताताई शिवाजीराव पाटील होत्या. तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. दारूमुळे गावात नेहमी हाणामार्‍या होऊन गावातील शांतता धोक्यात येत आहे. यामुळे गावातील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले व कायदेशीर मार्गाने दारुबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. त्यानुसार दारुबंदी आंदोनल समितीच्या रा•य, जिल्हा व तालाुका पातळीवरील प्रमुख कार्यकर्त्यांनी दारुबंदीबाबत मार्गदर्शन केले. नंतर गावात सर्वपक्षीय दारुबंदी आंदोलन समिती स्थापन करण्यात आली. याच विषयाबाबत सोमवार, दि. १ ऑगस्ट रोजी महिलांची विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली. या सभेस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर हे निरीक्षक म्हणून उपस्थित होते. सभेत महिलांची उपस्थित लक्षणीय होती. सभेपूर्वी साहित्यत्रन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस जयंतीनिमित्त निरीक्षक पाटेकर व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. सभेत शांताबाई नवनाथ कंगणकर यांनी दारुबंदीबाबत ठराव मांडला. शिवकन्या बाळासाहेब देशमुख यांनी सूचना मांडली, आशाबाई भारत काळर यांनी अनुमोदन दिले. सभा चालू असताना अनेक महिलांनी दारुबंदीबबात घोषणा दिल्या. या वेळी डॉ. नीलेश मंत्री, ग्रा.पं. सदस्य अरुण मातंग, संजय मातंग, बाळसाहेब देशमुख, पत्रकार रावसहेब निकाळजे सभायक्षा सौ. संगीताताई पाटील यांनी दारुबंदी बाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी पाटेकर यांनी महा राजस्व अभियान सप्ताहाबाबत माहिती देऊन दारुबंदीबाबत कायदेशीर कारवाई कशी करावी लागेल,असे म्हणाले. सभेस बोधेगावचे मंडलाधिकारी विकास जोशी, ग्रामसेवक, जालिंदर कोठुळे, तलाठी संदीप आठरे, संगम महिरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष व तालुका दूध संघाचे संचालक शिवाजीराव पाटील, सरपंच सौ. बेबीताई भराट, उपसरपंच विठ्ठल अभंग, दारुबंदी समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप, अशोक ढाकणे, संपतराव खलाटे, दत्तात्रय फुंदे, सदा गयाकवाड यांच्यासह अनेक उपिस्थत होते. प्रास्ताविक प्रा. भाऊसाहेब मुरकुटे यांनी केले.सूत्रसंचालन दारुबंदी आंदोलन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सुसे यांनी केले. महादेव अभंग यांनी आभार मानले

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: हातगावच्या ग्रामसभेत बाटली आडवी करण्याचा ठराव
हातगावच्या ग्रामसभेत बाटली आडवी करण्याचा ठराव
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEitHOA8FGImKt0ELU19VyKLwmOdOeyb_aVjZW7x0ycmu8J5W6leVpQHb-YvenNM6kABanUeO_eWxz4zRFsZXf-KcN6zCpXJ1nYJrghG-Og6P1g1Qs6GvXGh-74GrbLQ7bc9ucbps_tEvOjv/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_48.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_48.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago