अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी; मातंग भीम योद्धा मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प...
अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी;
|
मातंग भीम योद्धा मित्रमंडळाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना मंडळाचे अध्यक्ष विजय पठारे, गणेश घोरपडे, पंडित वाघमारे, सुनील भवर, सुनील बनसोडे, किरण गुंजाळ, श्रीकांत घोरपडे आदी. अहमदनगर : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोमवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध पक्ष व संघटनांच्यावतीने अण्णाभाऊंच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.
वीर लहुजी वस्ताद मित्र मंडळाच्या वतीने निलक्रांती चौक येथे सकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केक कापण्यात आला. तर संध्याकाळी बँजो व पारंपरिक वाद्यांसह मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी अध्यक्ष येशुदास वाघमारे, विशाल पारधे, सोहेल सय्यद, बॉबी आव्हाड, रुशाल साळवे, विकास गाडे, सुशांत शिरसाठ, सागर पारधे, बंटी ठोंबरे, प्रशांत भोसले, सचिन जाधव, रोहीत रोकडे, अंकुश कांबळे आदी उपस्थित होते. यावेळी निघालेल्या मिरवणुकीत कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतच्यावतीने अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. गावात उभारण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारक येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष अविनाश अळंदीकर, राजू रोकडे, नामदेव चांदणे, प्रमोद वाघमारे, अरविंद गेरंगे, दीपक रोकडे, ज्ञानेश्वर रोकडे, संतोष रोकडे, प्रदीप रोकडे, गणेश रोकडे, अतुल रोकडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सिद्धार्थनगर येथे मातंग भीम योध्दा मित्र मंडळाच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विजय पठारे, संस्थापक गणेश घोरपडे, पंडीत वाघमारे, सुनील भवर, सुनील बनसोडे, किरण गुंजाळ, श्रीकांत घोरपडे, अंकुश मोहिते आदी उपस्थित होते;









