शिक्षण हा मुलांना आनंददायी प्रवास वाटावा : मुळे अहमदनगर ; सध्याच्या स्पर्धेच्या गतिमान युगात मुले शिक्षणातील आनंद हरवून बसले आह...
शिक्षण हा मुलांना आनंददायी प्रवास वाटावा : मुळे
अहमदनगर ;
![]()
सध्याच्या स्पर्धेच्या गतिमान युगात मुले शिक्षणातील आनंद हरवून बसले आहेत. मुलांना ज्ञानप्राप्ती बरोबरच शिक्षण हा एक प्रकारे जीवनातील आनंददायी प्रवास वाटला पाहिजे. असे मत अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे यांनी व्यक्त केले. संस्थेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांच्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद््घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. ते म्हणाले की, संस्थेने जिल्ह्यात जवळपास २३ ठिकाणी इं्रग्रजी माध्यमाचे पूर्वप्राथमिकचे वर्ग सुरु केले आहेत. संस्थेच्या लोकीकाप्रमाणेच येथेही दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे.
कार्यशाळेच्या उद््घाटनप्रसंगी केलेल्या आपल्या प्रस्ताविकात संस्थेचे सचिव जी.डी. खानदेशे यांनी म्हटले की, शिक्षक हाच शिक्षण व्यवस्थेचा कणा आणि विद्यार्थ्यांचे खरेखुरे पाठय़पुस्तक असल्याने शिक्षक ज्ञानी, त्यागी, चारित्र्यसंपन्न तर असला पाहिजेच. परंतु त्याबरोबरच तो विद्यार्थ्यांच्या दृष्टीतून जगाकडे पाहणारा असणे गरजेचे असते. त्याला ही दृष्टी येण्यासाठी कार्यशाळा महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात. शिक्षकांच्या अंगी असलेल्या कौशल्यावर आणि अद्ययावत ज्ञानावर विद्यार्थ्यांची प्रगती अवलंबू असल्याने संस्थेने वर्षातून किमान दोन वेळा इंग्रजी माध्यमांच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
|










