डॉ. संजय कळमकर यांचे स्वामी विवेकानंद आणि आपण याविषयावर व्याख्यान यांत्रिक स्पर्धेमुळे चंगळवाद अहमदनगर ; विज्ञान आणि धर्म एकाच...
डॉ. संजय कळमकर यांचे स्वामी विवेकानंद आणि आपण याविषयावर व्याख्यान
यांत्रिक स्पर्धेमुळे चंगळवाद
अहमदनगर ;

विज्ञान आणि धर्म एकाच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. विज्ञान हे धर्माशिवाय, तर धर्म हे विज्ञानाशिवाय अपुरे आहेत. या दोन्हींची गल्लत केली, तर चंगळवाद फोफावतो आणि आजचा तरुण त्यातच सापडल्याचे विदारक असे चित्र दिसत आहे. म्हणजेच, स्वामी विवेकानंद यांनी दीडशे वर्षापूर्वी चंगळवादाची व्यक्त केलेली भिती आजच्या यांत्रिकरणाच्या स्पर्धेने खरी ठरत असल्याचे मत व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांनी व्यक्त केले. जिज्ञासा अकादमीतर्फे आयोजित स्वामी विवेकानंद आणि आपण या विषयावर डा. कळमकर यांनी बुधवारी मुक्तचिंतन केले.
डॉ. कळमकर म्हणाले, स्वामी विवेकानंद यांचे आयुष्यमान ३९ वर्ष. या काळात त्यांनी जगभर भ्रमण केले. या भ्रमंतीमध्ये त्यांनी फक्त भारत आणि समाज याचाच विचार केला. जगभरातील विज्ञानाची अपेक्षा व्यक्त करताना त्यात विधायकता स्वीकारला. धर्माचा अभ्यास करताना मानवतावाद आणि त्यावरील श्रद्धा स्वीकारली. विज्ञान आणि धर्म एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून हे दोन्ही घटक एकमेकांशिवाय अपूर्ण असल्याचे मत देखील त्यांनी मांडलं आहे. त्याचा अभ्यास आज कोठे होताना दिसत नाही. धर्मच्या नावाखाली चाललेला ढोंगीपणावर त्यांनी रोखठोक मते मांडली आहे. हिंदू धर्माचा अभ्यास करताना इतर धर्माचा अभ्यास करत सर्व धर्माचे एकच र्मम असून तो म्हणजे मानव कल्याण एवढाच आहे हे देखील विवेकानंदांनी स्पष्ट केले आहे. पण विवेकानंदासह इतर राष्ट्रपुरुषांना, संतांना आता वेगवेगळ्य़ा धर्मांधांनी वाटून घेतल्याची शोकांतिका कळमकरांनी यावेळी व्यक्त केली. यांत्रिकीकरण ही काळाची गरज आहे. पण त्यातून निर्माण झालेले प्रदूषण हे मानवनिर्मित असल्याचा विसर तरुणांना पडल्याची खंत कळमकर यांनी यावेळी व्यक्त केली. सख्या नात्यांबरोबर मित्रांमध्ये विश्वासाऐवजी यंत्रिक नाते निर्माण झाले आहे. त्यातून बौद्धिकता घटत जाऊन सैराटपणा वाढत चालला आहे. माणूस र्मयादा सोडून वागू लागला आहे. ही समाज विघटनांची लक्षणे आहे. यातून सहिष्णुतेचा अर्थ समजलाच नाही असे दिसते आहे. इतिहासात डोकावून पाहिल्यावर अनेक प्रश्नांची उत्तरे सापडत नाही. त्यामुळे क्षमाशीलता आजच्या समाजात दिसत नाही. स्वामी विवेकानंद यांनी यावर देखील मार्मिक विचार मांडले असल्याचे सांगून आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद वाचलेच पाहिजे असे कळमकर यांनी यावेळी ठासून सांगितले. जिज्ञासा अकादमीचे प्रा. विठ्ठल बुलबुले यांनी प्रास्ताविक केले. शिक्षक सुदर्शन शिंदे यांनी स्वागत केले.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस, उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी प्रदीप हलसगिरीकर, प्राचार्य डॉ. भास्कर झावरे, कडूभाऊ काळे, युनूस तांबटकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण









