एकदिवसीय बुध्दिबळ प्रशिक्षण शिबीर रविवारी ; अहमदनगर; विश्वविजेता बुध्दिबळपटू विश्वनाथ आनंदचे गुरु ज्योतीप्रकाशम (तामिळनाडू) हे...
एकदिवसीय बुध्दिबळ प्रशिक्षण शिबीर रविवारी ;
अहमदनगर;

विश्वविजेता बुध्दिबळपटू विश्वनाथ आनंदचे गुरु ज्योतीप्रकाशम (तामिळनाडू) हे रविवार १४ ऑगस्टला अहमदनगर मध्ये येऊन एक दिवसाचे प्रशिक्षण देणार आहेत, अशी महिती जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले. वुमन इंटरनॅशनल मास्टर कुमारी डॉ. शाल्मली गागरे ही सुध्दा येणार आहे.
खिस्तगल्ली येथील सप्तक सदन येथे सकाळी साडेदहा वाजता शिबिराचे उद््घाटन होईल. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हे शिबीर चालेल, असे संघटनेचे सचिव यशवंत बापट यांनी सांगितले. ज्योती प्रकाशन यांनी विश्व विजेता बुध्दिबळ खेळाउू विश्वनाथ आनंदला त्याच्या लहान वयात बुध्दिबळाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले होते. गणितीपध्दतीने विचार करुन बुध्दिबळ खेळाची नवीन पध्दत शोधून काढली आहे, असे डॉ. अण्णासाहेब गागरे यांनी सांगितले.
या शिबिरात नवीन संकल्पना शिकवल्या जाणार आहेत, असे खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी सांगितले. डावाचा शेवट, वेळेचे नियोजन यावर सुध्दा मार्गदर्शन केले जाणार आहे, असे शाम कांबळे यांनी सांगितले. याशिबिरात जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे विश्वस्त पारुनाथ ढोकळे यांनी केले आहे









