क्रांतीदिनी जागवल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृती \; अहमदनगर; जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिक...
क्रांतीदिनी जागवल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या स्मृती\;
अहमदनगर;

जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी क्रांतिदीनानिमित्त भुईकोट किल्याला भेट देऊन भारतीय स्वातंत्र्य संग्रामांच्या स्मृती जागविल्या.
प्रथम वर्षाचे १00 विद्यार्थी व प्राचार्य डॉ. आर. एस. देषपांडे यांनी भुईकोट किल्ल्यास भेट दिली. जेष्ठ इतिहासतज्ञ भूषण देषमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना नगरचा इतिहास, भुईकोट किल्ल्याचा इतिहास, भुईकोट किल्याची रचना, या किल्याचे महत्व, हा पाचषे वर्षांचा इतिहास त्यांच्या डोळयासमोर जिवंत केला. किल्ल्यामधील सोनमहाल, गगनमहाल, रुपमहाल, बगदादमहाल, दिलकषाद, बारुदखाना, दिवाण-ए-आम अषा अनेक वास्तुबद्दल माहिती सांगितली. विद्यार्थ्यांना सगळयात जास्त प्रभावित केले ते या किल्यामधील राष्ट्रीय नेत्यांच्या कक्षाने. चले जाव आंदोलनात पंडित नेहरु, बल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नरेंद्र देव आदि बारा राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंडितजींनी भारताचा शोध हा जगप्रसिध्द ग्रंथ इथेच लिहिला. या नेत्यांना जिथे ठेवण्यात आले होते, तो कक्ष जतन करण्यात आला आहे. पंडित नेहरुंनी वापरलेल्या वस्तू व त्यांच्या हस्तलिखिताच्या छायाप्रती तिथे पहावयास मिळतात.
इंजिनिअरींगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण घेणारे छत्रपती अभियांत्रिकीचे विद्यार्थी या ऐतिहासिक भेटीने हरकून गेले होते. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले









