चांगल्या वक्त्यांची समाजाला आवश्यकता' अहमदनगर चांगल्या वक्त्यांची समाजाला गरज असते. सर्वसामान्य, दुर्बल, हतबल आणि वंचित माण...
चांगल्या वक्त्यांची समाजाला आवश्यकता'
अहमदनगर

चांगल्या वक्त्यांची समाजाला गरज असते. सर्वसामान्य, दुर्बल, हतबल आणि वंचित माणसांचा आवाज हा व्यवस्थेला ऐकू जात नाही. अशावेळी वक्त्याने अशा घटकांचा आवाज बनले पाहिजे व त्यांना न्याय हक्क मिळवून दिला पाहिजे असे प्रतिपादन नामवंत वक्ते, साहित्यिक, शिक्षकनेते डॉ. संजय कळमकर यांनी केले.
जिज्ञासा अकादमीच्यावतीने गेली तीन महिने नगरमध्ये चला प्रभावी वक्ता बनू या विषयावर कार्यशाळा सुरू होती. त्यांच्या समारोप समारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील धर्मदाय सहआयुक्त कार्यालयातील अधिक्षक अभिजित अनाप व जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी अस्मिता लबडे-अनाप व अकादमीचे संस्थापक व प्रशिक्षक प्रा. विठ्ठल बुलबुले हे उपस्थित होते.
यावेळी अनाप म्हणाले की, मी जेव्हा जिज्ञासाचा प्रशिक्षणार्थी होतो तेव्हा शाळेच्या हॉलमधील संतरंजीवर प्रशिक्षण होत होते. आज एसी हॉलमध्ये प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी पाहून मनाला खूप बरे वाटले. सतरंजी ते एसी हॉल व प्रशिक्षक म्हणून विठ्ठलभाऊ या सर्व प्रवासाचा मी साक्षीदार आहे, असे म्हणून ते म्हणाले वक्ता होताना प्रमाण भाषा, बोली भाषा या भानगडीत आपण पडायचं नाही. मनापासून तळमळीने व लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकमनात विचार पेरणारी असावी हे ज्याला जमले तो पभावी वक्ता झाला म्हणून समजावे असे ते म्हणाले. शेवटी त्यांनी प्रशिक्षणार्थीना देण्यात येणार्या प्रमाणपत्रातील मजकुरचे कौतुक करून म्हणाले हे प्रमाणपत्र तुमची दिशा निश्चित करणार आहे.
यावेळी अस्मिता लबडे, एजाज खान, डॉ. परवेज शेख, निळकंठ खटके, इंजि. अनिस शेख, सुरेखा विद्ये, राहुल कांबळे, हनीफ शेख, अर्चना गुरप, अरुंधती नगरकर, केशव बुलाखे, तारिक शेख, गणेश वंगार, श्रीनिवास बुरगुल, अजय लयचेट्टी, त्रिशाली तोटा व प्रशिक्षक विठ्ठल बुलबुले यांनी प्रशिक्षणातील अनुभव कथन केले
| . |









