विदेशी भाषा परीक्षेत वाल्हेकर यांचे यश वाडेगव्हाण भाजपाचे पारनेर तालुका माजी सरचिटणीस नचिकेत वाल्हेकर हे दिल्ली येथील संरक्षण मं...
विदेशी भाषा परीक्षेत वाल्हेकर यांचे यश
वाडेगव्हाण

भाजपाचे पारनेर तालुका माजी सरचिटणीस नचिकेत वाल्हेकर हे दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करणार्या विदेशी भाषा विद्यालयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत, उत्तम यश संपादित करत रशियन भाषा गटात सातवा क्रमांक मिळवला आहे.
भारतीय लष्कर, वायूसेना, नौसेनेतील अधिकारी तसेच विविध प्रकारच्या भारतीय गुप्तहेर खात्यातील अधिकारी व संरक्षण खात्यातील इतर अधिकारी ज्यांना देशसेवेसाठी बाहेरील देशात जावे लागते व त्या कारणाने तेथील भाषा अवगत असावी लागते अशांसाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत संरक्षण खात्यातील अधिकार्यांव्यतिरिक्त सर्वसाधारण व्यक्तीपैकी ज्याला प्रवेश परीक्षेत व मुलाखतीत अतिउच्च श्रेणीत अव्वल अंक मिळाले. तरच सदर परीक्षामधे बसण्याची संधी दिली जाते. सदर परीक्षेमधून २५ जागा निवडायच्या होत्या. त्यात वाल्हेकर यांनी उत्तम यश संपादित करत रशियन भाषा गटात सातवा क्रमांक मिळवला आहे.
त्यांच्या यशाबद्दल जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजु, खासदार दिलीप गांधी, सरपंच सुरेश बोरुडे, पत्रकार दीपक करंजुले यांनी अभिनंदन केले आहे.









