लोकसहभागातून ५ हजार झाडांची होणार लागवड अहमदनगर ; केडगावमधील भूषणनगर भागात नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून आणि ल...
लोकसहभागातून ५ हजार झाडांची होणार लागवड
केडगावमधील भूषणनगर भागात नगरसेवक दिलीप सातपुते यांच्या पुढाकारातून आणि लोकसहभागातून ५ हजार झाडांची लागवड करण्याचे काम सुरु झाले आहे. यासाठी लागणार्या रोपांचा खर्च श्री. सातपुते स्वत करणार आहेत. झाडे जगविण्यासाठी त्याचे संवर्धन होण्यासाठी या रोपांच्या भोवती ट्री गार्ड लावले जात आहेत. त्याचा खर्च नागरिक करीत आहे. प्रत्येक नागरिकांनी त्यांनी बसवलेल्या ट्री गार्डला आपल्या मुलांची नावे दिल्याने त्या रोपांचे पालकत्व त्यांनी स्वीकारले असल्याची माहिती नगरसेवक दिलीप सातपुते यांनी दिली. भूषणनगर, सुचेतानगर, अयोध्यानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक सातपुते यांच्याकडे प्रभागात वृक्षलागवड करण्याचा आग्रह धरला. त्यानूसार सातपुते यांनी रोपे उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली. मात्र या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठी त्यांच्या भोवती ट्री गार्ड बसविण्याचा विचार पुढे आला. नागरीकांनी यासाठी तयारी दर्शवली. एका ट्री गार्डसाठी सुमारे ७00 रुपये खर्च करण्याची नागरीकांनी सहमती दर्शवली. केडगाव, साईनगर, भूषणनगर येथे सातपुते यांच्या प्रयत्नातून वृक्षारोपण करुन ट्री गार्ड बसविण्यात आले. यावेळी संजय गारुडकर, राजेंद्र शेळके, जयसिंग भोर, देवठे सर, शशिकांत बोरुडे, सुसरे सर, शिवाजीराव लंके, डॉ. गागरे, वैभव पाटील, नंदकिशोर साठे, रमेश परतानी, गौरव गारुडकर, योगेश पाथरकर आदी उपस्थित होते.
|










