अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू; आढळगाव ; श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक उकिर्डे (वय ५५)यांचे ...
अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू;
आढळगाव ;

श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अशोक उकिर्डे (वय ५५)यांचे आज रात्री ९ते ९:३0 वाजण्याच्या सुमारास अहमदनगर येथील कायनेटिक चौकात झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, उकिर्डे हे आज संध्याकाळी पोलिस स्टेशनचे कामकाज उरकून साप्ताहिक सुट्टीनिमित्त केडगाव येथील त्यांच्या घरी जाण्यासाठी श्रीगोंद्यावरून एसटी बसने नगरला आले होते. कायनेटिक चौकात उतरून ते रस्ता ओलांडत असताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उकिर्डे यांचे मूळ गाव राशीन होते. काष्टीला बिट हवालदार म्हणून त्यांनी जवळपास ३ वर्षे काम केले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांना पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली होती. ते श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कार्यरत होते.रात्री सोशल मीडियावर झपाट्याने उकिर्डे यांच्या अपघाती मृत्यू झाल्याचे वृत्त समजताच अनेकांना धक्का बसला. अनेकांचा यावर विश्वास बसत नव्हता उकिर्डे यांच्या अशा अचानक अपघाती मृत्यूने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.









