कर्जतला राज्यव्यापी कोपर्डी मराठा संसद कार्यक्रम ; ज़मीन वाटपाच्या वादातून झालेल्या भांडणात लष्करात सैनिक असलेल्या मुलानेच आईचा ...
|
कर्जतला राज्यव्यापी कोपर्डी
मराठा संसद कार्यक्रम ;
ज़मीन वाटपाच्या वादातून झालेल्या भांडणात लष्करात सैनिक असलेल्या मुलानेच आईचा खून केला. ही घटना पारनेर तालुक्यातील पिंपरीगवळी येथे दि. १५ रोजी सकाळी ७ ते ९ च्या सुमारास घडली. ताराबाई केशव मांडगे (वय- ४९, रा.पिंपरीगवळी)असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवराज केशव मांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेबाबत सुपा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी- मयत ताराबाई केशव मांडगे व त्यांचा मुलगा युवराज केशव मांडगे यांच्यात ज़मीन वाटपावरून वाद होता. सैन्यदलात कार्यरत असलेला युवराज सध्या सुट्टीवर घरी आलेला आहे. पतीच्या निधनानंतर ताराबाईने आपली दोन मुले एक युवराज व दुसरा सध्या शिरूर येथे पोलीस दलात असलेला जितेंद्र मांडगे यांच्या नावावर शेतीची वाटणी करून दिली आहे. राहिलेली ८ एकर जमीन स्वत:कडे ठेवली होती. या आठ एकराची वाटणी करून मिळावी, यासाठी युवराज आईशी नेहमी भांडण करत असे. दि.15 रोज़ी आई तिच्या नावावरील आठ एकर जमीन वाटून देत नाही, या कारणावरून मुलगा युवराज़ केशव मांडगे याने घराजवळील मक्याच्या शेतात आईला बेदम मारहाण केली. तसेच तोंडावर,गळयावर गंभीर जखमा करून तिला ठार मारले. याप्रकरणी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी युवराज केशव मांडगे यास सुपा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी लकारे यांनी भेट देऊन तापसाबाबत सृचना दिल्या. सुपा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सिध्देश्वर गोरे तपास करत असून, त्यांना पो हे कॉ सुखदेव दुर्गे,सोमनाथ कांबळे, शिवाजी ढवळे,अजय नगरे ,पोना. शिवाजी कडूस,गावडे,राहुल सपाट हे सहाय्य करीत आहेत
|










