नागेबाबा मंदिरात दानपेटी फोडली; भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक येथील ग्रामदैवत संत नागेबाबा मंदिरातील दानपेटी व सीसीटीव्हीच...
नागेबाबा मंदिरात दानपेटी फोडली;
भेंडा : नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक येथील ग्रामदैवत संत नागेबाबा मंदिरातील दानपेटी व सीसीटीव्हीचे रेकॉर्डर डिव्हाईस असा सुमारे ८९ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली.
मंदिरातील पुजारी गव्हाणे यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान विनोद देविदास गव्हाणे दर्शनास गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. परंतु पुजारी मंदिर परिसरात कोठेही न दिसल्याने त्यांनी पुजारी गव्हाणे यांना माहिती दिली. पुजारी गव्हाणे यांनी तातडीने मंदिरात धाव घेऊन पाहणी केली. चोरी झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी देवस्थानचे अध्यक्ष शिवाजी तागड व पोलीस पाटील बलभिम गव्हाणे यांना चोरीची माहिती दिली. बलभीम गव्हाणे यांनी कुकाणा व नेवासा पोलिसांना घटनेची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपअधिक्षक प्रताप बाविस्कर, श्वान पथकाचे एस. डी. बावळे, आर. आर. विरकर, ठसे तज्ञ घटनास्थळी हजर झाले. 'मिस्का' या श्वानाने मंदिराला फेरी मारली. मात्र, चोरट्यांचा शोध लागला नाही. चोरीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी बंद पाळला.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ भेंडा बुद्रूक येथील व्यावसायिकांनी शुक्रवारी दिवसभर बंद पाळला. यापूर्वी २६ वर्षापूर्वी मंदिरातील पितळी घंटा व धातूच्या मूर्ती चोरीस गेल्या होत्या. या चोरीतील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले होते. चोरट्यांनी चोरलेली दानपेटी शुक्रवारी सकाळी ११ वाजता गवत घेण्यासाठी निघालेल्या शांताबाई आढागळे, शैलाबाई शिंदे यांना एका शेतात दिसली. दानपेटी पाहण्यासाठीही ग्रामस्थांनी गर्दी केली होती.










