रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ; अहमदनगर ; स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अल्फा ओमेगा ख्र...
|
|  |
|
रक्तदान शिबिरास
युवकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ;
अहमदनगर ;
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ व बुथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बुथ हॉस्पिटल येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवकांनी उत्स्फुर्तपणो उपस्थित राहून रक्तदान केले. ज्यावेळी आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला रक्ताची गरज भासते तेव्हाच रक्तदान किती महत्त्वाचे आहे समजते. रक्त फक्त मानवी शरीरातच तयार होत असल्याने रक्तदान महत्त्वाचे ठरत आहे. अपघात प्रसंगी रुग्णास एखाद्या गटाचा रक्त तातडीने न मिळाल्यास वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. देशासाठी रक्त सांडण्याची भावना आपण नेहमीच व्यक्त करतो. मग तेच रक्त देशातील नागरिकांचे प्राण वाचविण्याकरिता दान करण्यास मागे पुढे का पाहतो? असल्याचे सांगून युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन अल्फा ओमेगाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॅनियल काळोखे यांनी केले. धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय उत्सव रक्तदानाने साजरे केल्यास रक्ताची कमतरता भासणार नाही. स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी सांगितले. थॅलेसमिया रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. या रुग्णांना रक्त उपलब्ध करुन देण्यासाठी समाजातील नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहन अँड़ गफ्फार शेख यांनी केले. यावेळी डॉ.अभय साळवे, डॉ.जॉन उजागरे, ब्र.सज्रेराव साळवे, अँड़ योहान मकासरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संघाचे जिल्हा सचिव रवि चांदेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा युवा अध्यक्ष मोनेष ढाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिपक आल्हाट, राजेश थोरात, किरण पवार, मनोज प्रभुने, अतुल गवारे, सुनित ढगे, सागर घोडके, सावन वाघमारे, राजेश उजागरे, दिपक कानडे, अक्षय ससाणो, अभय साठे, लुकस वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
|
|
|
|
|