कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या ब्रेनमॅपिंग चाचणीला परवानगी; अहमदनगर;कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील अत्याचार व खू...
कोपर्डी प्रकरणातील आरोपींच्या
अहमदनगर;कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील तिघा आरोपींच्या ब्रेनमॅपींगसह इतर पाच चाचण्यांना जिल्हा व सत्रन्यायाधीश एम.एच. देशपांडे यांच्या न्यायालयाने परवानगी दिली.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करुन तिचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आलेले आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे, नितीन भैलूमे आणि संतोष भवाळ यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची नार्काे व ब्रेनमॅपींग (मानसोपचार चाचणी) करण्यासाठी पोलिसांच्यावतीने शनिवारी (दि.३0) न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आरोपींच्या वकिलांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी (दि. १ ऑगस्ट) सुनावणी ठेवण्यात आली होती.
सोमवारी (दि. १) या गुन्ह्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलूमे आणि संतोष भवाळ यांना सुनावणी कामी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपींकडे याबाबत विचारणा केली. त्यावर न्यायालयाने तिघा आरोपींच्या ब्रेनमॅपींगसह इतर पाच चाचण्यांना परवानगी दिली. यावेळी सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अँड़ सतीश पाटील हजर हेाते.
या प्रकरणातील आरोपींची नार्काे व ब्रेनमॅपींग (मानसोपचार चाचणी) करण्यासाठी पोलिसांच्यावतीने शनिवारी (दि.३0) न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर आरोपींच्या वकिलांचे म्हणणे मांडण्यासाठी सोमवारी (दि. १ ऑगस्ट) सुनावणी ठेवण्यात आली होती.
|










