राज्यातील मोबाईल टॉवर टेक्निकल कर्मचारी आजपासून संपावर अहमदनगर विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...
राज्यातील मोबाईल टॉवर टेक्निकल
कर्मचारी आजपासून संपावर
अहमदनगर

विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने आजपासून (दि. ११) संप पुकारण्यात आला आहे. संपात कर्मचार्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन असो. चे अध्यक्ष सदाशिव खेडकर, कायदेशीर सल्लागार श्रीरंग गिते, राज्य संघटक योगेश ओव्हळ, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव प्रसाद तरवडे, खजिनदार भरत झेंडे, हरिष डेकाटे, संदीप बडे यांनी केले आहे.
याबाबत श्री. खेडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, रिजनल लेबर कमिशनर (मुंबई) यांच्या कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व संघटना यांच्यामध्ये बैठका झाल्या. बैठकीत कर्मचार्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या. वारंवार मागणी करुनही कर्मचार्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. राज्यातील आयडीया कंपनीचे सुमारे ४00 ते ५00 तांत्रिक कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत. ठाणे, रायगड, पालघर, अलिबागसह राज्यातील सर्व तांत्रिक कर्मचारी संपात भाग घेणार आहेत. कर्मचार्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य केल्या जात नाही, तोपर्यंत संप सुरुच राहील, असा इशारा श्री. खेडकर यांनी दिला आहे. असो. चे मुख्य कार्यालय नगरला असून, राज्यभर सभासद आहेत. मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असो.च्या माध्यमातून तांत्रिक कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी लढा दिला जात आहे. २४ मे २0१३ रोजी असो. ची स्थापना झाली असून, असो. च्या माध्यमातून कर्मचार्यांवर अन्याय दूर करण्याचा प्रय▪केला जातो. लोकशाहीच्या मार्गाने यापूर्वी आंदोलन करण्यात आले व यापुढेही आंदोलन चालुच ठेवू, असे श्री. खेडकर यांनी नमूद केले
| . |









